मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी करा हे उपाय...नक्की होईल फायदा !


औषधांमुळे काही काळ स्मरणशक्ती वाढल्यासारखे वाटते परंतु औषधे घेणे हा काही स्थायी उपाय नव्हे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मनुष्य शारीरिकरीत्याच नव्हे तर मन आणि मेंदूच्या स्तरावरही अस्त - व्यस्त झाला आहे. या यंत्रयुगात माणसाची अधिकांश शारीरिक आणि मानसिक कामे यंत्रांकडूनचे केली जात आहेत. या अति यांत्रीकीकरणामुळे जीवन अधिक सुविधाजनक बनले आहे. परंतु यामुळे शारीरिक आणि मानसिक दुर्बलताही आली आहे. 


स्मरणशक्ती दुबळी होत चालली आहे. यामुळे अनेकांना विसरण्याची सवय लागली आहे. याची मुख्य कारणं आहेत कामाचा ताण, अधिक व्यस्तता आणि अनियमित दिनचर्या. स्मरणशक्ती वाढविण्याचे अनेक उपाय आहेत. औषधांमुळे काही काळ स्मरणशक्ती वाढल्यासारखे वाटते परंतु औषधे घेणे हा काही स्थायी उपाय नव्हे.
प्रभावी उपाय

- उगवत्या सूर्याकडे मुख करून ध्यान मुद्रेत बसा. आता मनात उठणा-या विचारतरंगांकडे तटस्थपणे पाहा. या स्थितीला साक्षी साधना म्हणतात. हा अभ्यास रोज 10 मिनिटे करा. 15 दिवसांत हळू हळू मन एकाग्र होत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल.

- ज्या गोष्टींवर मनुष्य अधिक एकाग्र होतो त्याच गोष्टी त्याच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. पूर्णपणे वर्तमानात जगा अर्थात एखादे काम करताना अन्य गोष्टींना मनात स्थान देऊ नका. मग पाहा तुम्हाला विस्मरणाची समस्या भेडसावणार नाही.

- याशिवाय रोज योगासने प्राणायाम या बाबी आपल्या दिनचर्येत सामील करा.

- सकाळच्या ताज्या हवेत फिरा.

- दीर्घ श्वास उच्छवास करा, याने शरीर आणि मेंदूला अधिक कॉक्सिजन मिळून तरतरी राहते.
थोडे नवीन जरा जुने