माती-खडू खाण्याची सवय तुमच्या मुलांना आहे का?
लहान मुल म्हटलं की, आपल्या वाढत्या वयानुसार ते नवनवीन गोष्टी शिकत आणि करत असतात. हेच शिकतांना काही सवयी मुलांना लागतात. कधी-कधी या सवयी मुलांच्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. 


त्यातीलच एक सवय म्हणजे अनेकदा आपण लहान मुलांना खडू, माती किंवा भिंतींवरील पोपडे काढून खातांना बघतो. आई-वडील सतत रागवतात, सांगतात की, असं करू नये पण अनेक प्रयत्नांनंतरही मुलांची ही सवय ते तोडू शकत नाहीत.

लहान मुलांमध्ये माती खाण्याची ही सवय म्हणजे त्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते, हे तुम्हाला माहिती आहे का?

मुलांची ही सवय सोडवण्यासाठी सर्वात अगोदर त्यांचं डाएट बदलायला पाहिजे. त्यांना फक्त दूध नाही तर भाज्या, फळं आणि जेवू घालणं फार आवश्यक आहे.

जर मुलांची ही सवय सोडविण्यासाठी तुम्ही त्यांना रागवत-मारत असाल तर थांबा, असं केल्यानं मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. माती आणि खडू खाल्ल्यानं मुलांच्या पोटात जंत होऊ शकतात. तसंच त्यामुळं मुलांना स्टोनचाही त्रास होऊ शकतो.

आपल्या बाळाला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. त्याला इतकं बिझी करा की त्याला भिंतीवरील पेंट काढून खायला आणि माती खायला वेळ मिळायला नको.

याबाबतीत आपण लवंगचा वापर करू शकतो. ४-५ लवंग घेऊन पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी दिवसभर मुलांना पाजावं. कमीतकमी दिवसातून तीन वेळा तरी हे पाणी द्यावं. त्यामुळं त्यांची ही सवय सुटू शकते.

लहान मुलांना आपण केळ आणि मध मिळून खायला द्या. यामुळं काही दिवसांमध्येच तुम्हाला मुलांमध्ये बदल झालेला दिसेल.

आपल्या मुलांची डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्यावी. त्यांच्या शरीरात कोणत्या पोषण द्रव्याची काही कमी तर नाही ना हे तपासून पाहावं. मुलांना संपूर्ण पोषण आहार द्यावा.

मुलांची ही सवय सोडविण्यासाठी दररोज रात्री कोमट पाण्यासोबत लहान चमचाभर ओवा मुलांना खायला द्यावा.

आपल्या मुलाची नीट काळजी घ्या. कारण वारंवार माती खाल्ल्यानं पोटच खराब होतं असं नाही तर काही गंभीर आजारही होऊ शकतो.

जर आपण आपल्या मुलाची ही सवय सोडवू शकत नसाल तर त्याला लगेच डॉक्टरांकडे न्यावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा.

थोडे नवीन जरा जुने