कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवा...


तुम्ही कधी इतरांच्या चेहर्‍यावर हसू आणले आहे काय? नसेल तर एकदा असे करून पाहा. तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. त्यासाठी फक्त एवढेच करा..

एखाद्या जुन्या मित्राला फक्त हालहवाल विचारण्यासाठी फोन करा.

एखाद्याला त्याच्या कामगिरीबद्दल शुभेच्छा द्या.

एखाद्या सहकार्‍याकडून आपल्या प्रकल्पाबाबत सल्ला घ्या.

एखादा मित्र जर निराश असेल तर त्याच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत वेळ घालवा. 

सायंकाळच्या वेळी सहकार्‍यांना चहा पाजा किंवा काहीतरी खाऊ घाला.तणावमुक्तीचा मंत्रथोडे लवकर उठाआजच्या जमान्यात कुणालाही सकाळी लवकर उठावेसे वाटत नाही. विशेषत: तणाव असल्यास लवकर उठण्याची इच्छा होत नाही. 

जर तुम्हाला खरेच तणाव घालवायचा असेल तर आपल्या नियमित वेळेपेक्षा दहा मिनिटे लवकर उठावे. एकदम रिलॅक्स राहा आणि पुढच्या दिवसाबाबत कोणताच विचार करू नका. त्यानंतर जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल.
थोडे नवीन जरा जुने