काही प्रमाणात निर्माण होणारा ताणतणाव हा चांगला असतो , मग वाईट काय ? वाचा...


काही प्रमाणात निर्माण होणारा ताणतणाव हा चांगला. जर आपल्याला अगदी उत्तम कार्यपद्धती हवी असेल तर थोडा तणाव आवश्यक आहे. नाहीतर आपण खूपच आळशी होऊ. आपल्याकडून कुठल्याच प्रकारचं भरीव काम होणार नाही. अतिरिक्त तणाव हा वाईटच. 

या तणावाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यक्तीला सहन करावे लागतात. म्हणजे जी माणसं सतत हसत-खेळत असतात, त्यांना कुठल्याच प्रकारचा तणाव नसतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्यावर असणारा तणाव न दाखवता काम करणं ही त्यांची कार्यपद्धती आहे. अर्थात ती चांगली. मात्र ती प्रत्येकाला जमतेच असं नाही.

सतत चिडणं, दुस-यांवर राग काढणं, टीका करणं, मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या व्याधी जडणं, मनात नको नको ते न्यूनगंड निर्माण होणं, विसरणं, अति खाणं, खोटं बोलणं, स्त्रियांमध्ये गायनॅकोलॉजिकल समस्या निर्माण होणं. याच्या जोडीने हृदयविकार वाढतो. काही लोकांना सतत शौचास, किंवा लघवीस होते. अ‍ॅसिडीटी वाढते. 

लहान मुलं अंथरुण ओलं करतात. मनात विचारांचा गोंधळ निर्माण होतो. व्यसनाधीनता वाढते. काही जण तर एकलकोंडे होतात. चंचलवृत्ती वाढते. एकाग्रता कमी होते. काही जणं अन्न-पाणी सोडतात. याच्या उलट काही प्रमाणापेक्षा जास्त खातात. ज्या स्त्रियांना गरोदरपणात सर्वात जास्त तणाव असतो त्यांची अपत्य ही चंचल असतात. वृद्धांमध्ये विसराळूपणाची समस्या वाढते.
थोडे नवीन जरा जुने