डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'या' काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.


डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (डायबिटीस) एक असा आजार आहे, जो वयाच्या कोणत्याही वर्षी शरीराला जडू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी आपल्या रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. 

अनेक वर्ष रक्ताची तपासणी न केल्यामुळे तुम्ही या आजारापासून अनभिज्ञ राहू शकता. तपासणीनंतर तुम्हाला डायबेटीस आहे, असे समजल्यास घाबरून जाऊ नका. हा असाध्य आजार नाही. नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे या आजारावर नियंत्रण शक्य आहे. या व्यतिरिक्त डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे दिलेले काही खास घरगुती रामबाण उपाय एकदा अवश्य करून पाहा..

उपाय -

डाँग (गुजरात) येथील आदिवासी यांच्यानुसार दालचिनी चूर्ण २ ग्रॅम आणी एक लवंग उकळत्या पाण्यात टाकून झाकून ठेवा. १५ मिनिटानंतर हे पाणी प्या. दररोज सकाळ-संध्याकाळ हा उपाय केल्यास डायबिटीसवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

ज्या लोकांच्या हात-पायावर नेहमी सूज येते तसेच अनियंत्रित शर्करेचा त्रास असेल तर हा उपाय अवश्य करावा.


पाताळकोट येथील हर्बल जाणकार डायबिटीस रुग्णांना पत्ताकोबीच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.

डाँग येथील आदिवासी बेल आणि सीताफळाच्या पानांचे एक चमचा चूर्ण समान मात्रेमध्ये डायबिटीस रुग्णांना देतात.


भेंडीचे चूर्ण (५ ग्रॅम) विलायची (५ ग्रॅम), दालचिनी चूर्ण (३ ग्रॅम) आणि काळे मिरे (५ दाणे) एकत्र कुटून मिश्रण तयार करून घ्या. डायबिटीस रुग्णांना या मिश्रणाचे तीन समान हिस्से करून दररोज तीन वेळेस कोमट पाण्यातून द्यावे.


आदिवासी लोकांच्या उपायानुसार दररोज लिंबाच्या झाडाची पानं चावून-चावून खाल्ल्यास डायबिटीस रुग्णांना आराम मिळतो.
थोडे नवीन जरा जुने