काही वाईट सवयींमुळेही आरोग्याला फायदा होऊ शकतो...साधारणपणे निरोगी राहायचे असेल तर वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. याउलट अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे आरोग्य सुधारू शकते, फक्त त्याचे प्रमाण जास्त असू नये. 


तज्ज्ञांच्या मते कॉफीचे सेवन करणे, झोपेतून उशिरा उठणे किंवा रागावणे यासारख्या अनेक सवयी आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत; परंतु कधी-कधी असे करणेही वाईट नाही. कोणती वाईट सवय आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया... 

काम करताना चालणे 

विद्यार्थीवर्ग सुरू असताना कॉरिडॉर किंवा मैदानात दिसता कामा नये, आदींबाबत शाळांमध्ये अत्यंत कडक शिस्त असते; परंतु मोठ्यांना अशा प्रकारची कोणतीच शिस्त नसते. एका संशोधनानुसार कार्यालयात काम करणाऱ्या लोकांनी एकाच ठिकाणी बसून राहण्यापेक्षा अधून-मधून चालत राहावे. हाच नियम घरीही लागू करावा. अशा पद्धतीने 350 अतिरिक्त कॅलरी खर्च केल्या जाऊ शकतात. 

रागाने बेभान होणे 

साधारणपणे रागावर योग्य नियंत्रण ठेवण्यातच समजूतदारपणा असल्याचे म्हटल्या जाते. याउलट अनेकवेळा असे न करणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एका स्वीडिश संशोधनानुसार राग न आल्याने तणाव वाढतो. यामुळे हृदयरोगांची शक्यताही वाढू शकते. तसेच नकारात्मक विचारांपासून बचाव करण्यासाठीही हे गरजेचे आहे. 

सकाळी उशिरापर्यंत झोपणे

विकेंडला लेट नाइट मौज-मजा किंवा पार्टी केल्याने रात्री उशिरापर्यंत झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे निश्चित आहे. पुरेशी झोप न झाल्यास अनियंत्रित वजन आणि हृदयरोगांसोबतच वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता वाढते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच ब्रुनेल विद्यापीठाच्या एका इतर संशोधनानुसार व्यायाम करण्यास उशीर झाला तरी चालेल; पण आठ तासांची झोप पूर्ण केलीच पाहिजे. जर तुम्ही काही कारणांमुळे वेळेवर झोपू शकला नसाल आणि तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर ती तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक ठरते. 

कॉफीचे सेवन करणे 

कॉफीचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे; परंतु कॉफीचे निश्चित प्रमाण मेटाबॉलिझम (चयापचय) तीव्र करण्यात आणि व्यायाम करताना ऊर्जा वाढवण्यास साहाय्यक ठरते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका संशोधनानुसार जे लोक दररोज दोन कप कॉफीचे सेवन करतात ते तणावग्रस्त असण्याची शक्यता कमी असते. 
जास्त विचार करणे 

तथापि, ही सवय व्यक्ती आळशी असल्याचे सांगते; परंतु युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील संशोधकांचे असे म्हणणे आहे की, जे लोक कोणत्याही प्रकरणातील विविध पैलूंच्या बाबतीत विचार करतात किंवा जास्त विचार करतात आणि सतत विचारमग्न असतात अशा लोकांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता अधिक असते. हे लोक दैनंदिन कामांबाबत अधिक सक्रिय असतात. 
गॉसिपिंग

या सवयीला वाईट म्हटल्या जाते; परंतु कधी-कधी असे करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. एखाद्याच्या बाबतीत चर्चा करणे, काम करताना थकवा आल्यास मध्येच हास्य-विनोद करणे इत्यादी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटल्या जाते. 

तज्ज्ञांच्या मते अनेकवेळा मूड चांगला करण्यासाठी असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे कामाच्या ताणातून थोडीफार सुटका होईल आणि मित्रांसोबत हास्य-विनोद केल्याने फिल गुड हार्मोन सक्रिय राहतील. यामुळे तणाव किंवा चिंता दूर होते.
थोडे नवीन जरा जुने