योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?पाणी शरीरासाठी लागणार्‍या अनिवार्य तत्वांमधील एक आहे. स्वच्छ आणि पर्याप्त पाणी प्यायल्यानेच मनुष्य विविध आजारांपासून दूर राहू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होऊ लागते आणि शरीरातील विविध क्रियांवर याचा वाईट प्रभाव पडतो. 


शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पाचनतंत्राशी संबंधित समस्या

पर्याप्त प्रमाणात पाणी न प्यायल्यास पाचन तंत्राशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अन्न पचण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे केवळ वजन वाढत नाही तर शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते. यामुळे विविध प्रकरचे आजार निर्माण होऊ शकतात.

चेहर्‍यावर सुरकुत्या

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि चेहर्‍याची चमक नष्ट होते. पाण्याच्या कमतरतेमुळे चेहरा डल आणि सुस्त दिसू लागतो.


हृदयाच्या समस्या

पर्याप्त प्रमाणात पाणी न प्यायल्याने हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ लागते आणि रक्तसंचारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या व्यतिरिक्त किडनीशी संबंधित समस्या, कोलेन, कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.


वजन वाढणे

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे वजन वाढू लागते. पाणी शरीराला केवळ तरुणच ठेवत नाही तर वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जे लोक कमी पाणी पितात, त्यांचे वजन वाढू शकते.


थकवा

शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डीहायड्रेशनमुळे थकवा येण्याची समस्या निर्माण होते. डीहायड्रेशन म्हणजे कोशिकांना पर्याप्त प्रमाणात पाणी न मिळणे आणि यामुळे शरीरात उर्जेची कमी राहते, ज्यामुळे थकवा जाणवतो. यामुळे डोकेदुखी, तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.
थोडे नवीन जरा जुने