तोल जाऊन रेल्वेतून खाली पडल्याने तरूणाचा मृत्यू


जळगाव : रोजगार मिळविण्याच्या अनुषंगाने मित्रांसोबत पुणे येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे येथे जात असताना गर्दीत तोल जाऊन अचानक धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

उत्तम बिसन सोनवणे (३५) रा. धानखेड (ता.बोदवड) असे मृत तरूणाचे नाव आहे. धानखेड येथे उत्तम बिसन सोनवणे हा पत्नी रेखा, तसेच मुलगी प्रियंका (१०), भुरी (०५) ,मुलगा संतोष अशासह वास्तव्यास होता. 

हातमजुरी करून तरूण कुटुंबाचा उदारनिर्वाह करत असायचा. दरम्यान रोजगार मिळावा,म्हणून चुलत भाऊ गजानन सोनवणे, संजय सोनवणे, ज्ञानेश्­वर पाटील, अरुण हे कामाच्या शोधात पुणे जात होते. त्यांच्यासोबत उत्तम सोनवणे यानेही पुण्याला जाण्याचे ठरविले. 

त्यानुसार हे तरूण सोमवारी दुपारी ०४.४५ वाजता मलकापूर येथून सर्व जण महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पुणे येथे जाण्यासाठी जनरल बोगीत बसले होते. 
थोडे नवीन जरा जुने