झोपण्यापूर्वी ह्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे नाहीतर...


शरीर, मन आणि आत्म्याला आरोग्यदायी ठेवण्यासाठी झोपेची गरज असते. परंतु रात्रभर गाढ झोप घेणारे भाग्यवान खूप कमी असतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, ताजेतवाने होण्यासाठी 9 तास झोपेची गरज असते.

तज्ज्ञांच्या मतानुसार साडेसात तास झोप पुरशी आहे. परंतु ही झोप झोपच्या गोळ्या न घेता घेतलेली असली पाहिजे. योगशास्त्रानुसार शवासनाने कमी वेळेत अधिक विश्रांती मिळते. त्यामुळे योग करणा-या वक्तीस 5 ते 6 तास झोप पुरेशी असते.

आपल्याला गाढ झोप न येण्यामागे आपल्या अंथरूणातही दोष असू शकतो हे किती जणांना माहित आहे बरं ? तुम्हाला चांगली झोप लागत नसेल तर वेळीच सावध व्हा. 

तुम्हाला मऊ गादीशिवाय झोप येत नाही, ही बाब ठीक आहे. परंतु मऊ गादीमुळेच तुमच्या झोपेचे खोबरे होत आहे असे म्हटले तर...? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मऊ गाद्यांमुळेच आपल्याला कंबर आणि पाठीचे दुखणे सुरू होते.

अस्थिशास्त्रातील जाणकार सांगतात की, दिवसभर आपण उठतो कसे, बसतो कसे यावरूनही हाडांचे दुखणे सुरू होते. याचवेळी आपण आपल्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली पाहिजे. वजन वाढल्यामुळे शरीराचा भार गुडघ्यांवर पडून गुडघेदुखी सुरू होते. 

म्हणून वृद्धापकाळ येण्यापूर्वी कंबर दुखी आणि पाठदुखी मागे लागू नये असे वाटत असेल, गाढ झोप लागावी वाटत असेल तर अधिक सॉफ्ट गादीवर झोपणे टाळा.
थोडे नवीन जरा जुने