रात्री उशिरा पर्यंत जागे राहत असाल तर,चेहर्यावर दिसतील 'हे' बदलाव...रात्री उशिरा झोपणे, मेकअप तसाच ठेवणे आणि कोणतीही सावधगिरी न बाळगता थंड हवेत जाणे यासारख्या वाईट सवयींचे दुष्परिणाम काही दिवसानंतर पाहायला मिळतात. साधारणत: या समस्या सौंदर्याशी निगडित असल्याचे लोक समजतात. तथापि, खरी कारणे वेगळी असतात. 


डोळे सुजणे : 

अधिक थकवा आल्याने डोळ्यांखाली सूज येते. लंडन येथील कॅडोजेन क्लिनिकच्या सुझान मॅयू म्हणतात की, अल्कोहोलचे अधिक सेवन, हार्मोनल समस्या आणि पुरेशी झोप होत नसल्याने डोळ्यांखालील त्वचेत फ्लूड म्हणजेच द्रव एकत्र होऊ लागते. त्यामुळेच डोळे सुजल्यासारखे वाटतात. यापासून बचाव करण्यासाठी डोक्याखाली नेहमी उशी ठेवूनच झोपावे. तसेच काही मिनिटे डोळ्यांवर बर्फाच्या थंड पाण्यात भिजवलेला कपडा ठेवू शकता. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. 

ओठ उलणे : 

हिवाळ्यामध्ये नाक किंवा ओठाची त्वचा उलते. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेह-यावर व्हॅसलिन क्रीम लावावी. तसेच झोपण्यापूर्वी चेह-यावरील मेकअप न विसरता काढावा. सुझान म्हणतात की, खास करून हिवाळ्यात मॅटी आणि फ्रोस्टी लिपस्टिक लावू नये. यामुळे ओठ उलतात आणि ओठांच्या नैसर्गिक गुलाबी रंगावर परिणाम होतो. 

चेह-याची त्वचा कोरडी पडणे : 

सुझान म्हणतात की, हिवाळ्यात आर्द्रतेचा अभाव असल्यामुळे त्वचा कोरडी होऊन झडू लागते. तसेच या वातावरणात अधिक मेकअप करणे आणि झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ न करणे यामुळेही त्वचेच्या नवीन पेशींच्या विकासात अडथळा येतो आणि त्वचेचा पांढरा थर निघू लागतो. हिवाळ्यात आंघोळ करण्यासाठी किंवा चेहरा स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर कदापिही करू नये. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. तसेच आऊटडोअर व्यायाम करावा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचा चांगली दिसते. 

निर्जलीकरणाची शक्यता : 

अनेकजण रात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये मद्यसेवन करतात; परंतु अतिसेवनामुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे मेंदूच्या रक्त वाहिन्यांवर वाईट परिणाम पडतो आणि डोके दुखायला लागते. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या डोकेदुखीवर वेदनाशामकही परिणाम करत नाही. त्यामुळे मद्यसेवनापूर्वी पाणी प्यावे किंवा थोडे जेवण करावे. असे केल्यास रक्तवाहिन्या लवकर मद्याचे शोषण करू शकणार नाहीत. यामुळे डोकेदुखी आणि निर्जलीकरणापासूनही बचाव होईल. 

डोळे लाल होणे : 

काही लोकांचे डोळे लाल होतात किंवा त्यामध्ये लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात.
थोडे नवीन जरा जुने