धक्कादायक ! साबण, टूथपेस्टच्या ट्राईक्लोजेन रसायनामुळे होऊ शकतो 'हा' भयंकर आजार


संशोधकांना आढळले की, टूथपेस्ट, साबण यांच्यामध्ये ट्राईक्लोजेन नावाच्या रसायनाचा वापर केला जातो. हे बॅक्टेरियांना अँटीबायोटिक औषधांबाबत अधिक प्रतिरोधी बनवू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही अँटीबायोटिकचा परिणाम होणार नाही. 

संशोधनानुसार, जे बॅक्टेरिया ट्राईक्लोजेनच्या संपर्कात येतात, ते या बाबत अधिक प्रतिरोधी होऊ शकतात. क्यूनोलोनेस सामान्य अँटीबायोटिक आहे. ज्याचा वापर मूत्रनळीचे संक्रमण, साइनसिसिस, ब्राँकायटीस, न्यूमोनियावरील उपचारासाठी केला जातो. 

संशोधकांनुसार टूथपेस्ट आणि साबण या सारख्या उत्पादनांच्या द्वारे लोकांपर्यंत ट्राईक्लोजेन सारखे सारखे पोहोचते. ज्यामुळे त्यांच्यात असलेले बॅक्टेरिया सुलभतेने अँटीबायोटिक प्रतिरोधी होऊ शकतात. अशा वेळी त्यांचा एखाद्या सुपरबगच्या तडाख्यात सापडण्याचा धोका वाढतो. 

एक वर्षांपूर्वी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने बॅक्टेरियाविरोधी सावणात ट्राईक्लोजेनच्या वापरावर बंदी घातली. ट्राईक्लोजेन काय आहे ? हा टूथपेस्ट, साबण आणि इतर अनेक स्वच्छता उत्पादनांमध्ये आढळणारा ‘ सक्रिय ' घटक आहे. याला बॅक्टेरियारोधी आणि कवकरोधी गुण असणारे रसायन मानले जाते. 

वैज्ञानिकांनी या रसायनाला बॅक्टेरियाचा सफाया करण्यात सक्षम मानले नव्हते. त्यांच्यानुसार गरम पाणी आणि सामान्य साबण ट्राईक्लोजेनच्या तुलनेत बॅक्टेरियाला नष्ट करण्यात जास्त सक्षम आहेत. 

ही माहिती मिळाल्यानंतर अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकोपयोगी वस्तूमध्ये या रसायनाच्या वापरावर बंदी घातली. त्याच्या व्यतिरिक्त टूथपेस्ट, साबण आणि मुलांची खेळणी यांच्यासह घरगुती वापराच्या अनेक उत्पादनांमध्ये ट्राईक्लोजेनचा वापर अजूनही सुरू आहे.
थोडे नवीन जरा जुने