मासे खाण्याचे शरीरासाठी हे आहेत फायदे जाणून घ्या !


असे म्हणतात की हे दुनियेतील सर्वात पौष्टीक अन्न आहे. मासे खाण्यामुळे ते तुमच्या शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी, हृदय आणि डोकं तंदुरूस्त ठेवण्यासाठी मदत करते.

त्याचसोबत यातील पोषकतत्व वाढत्या वयाबरोबर तुमच्या दृष्टीची क्षमता वाढवण्यासाठी आणि डोळ्याच्या समस्या कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडत. चला मग मासे खाण्याचे अजून फायदे पाहूया -

ऊर्जा वाढवण्यासाठी - 
मासे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी आवश्यक प्रथिने पुरवते. कारण मास्यामध्ये ही प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून मासा हा एक चांगला पर्याय आहे. माश्याच्या सेवनाने पुरेसे प्रथिने शरीराला भेटून तत्काळ शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करते.


त्वचा उजळणे - 
माश्याच्या दररोज सेवनाने शरीराला ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रथिने, जीवनसत्व 'अ' आणि 'ब' यांचा चांगला पुरवठा होतो. हे सर्व पोषकतत्वा त्वचेला तजेला आणि सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर असतात. माश्याच्या सेवनाने त्वचेवर अकाली सुरकुत्या आणि वेगवेगळे डाग पडण्यापासून संरक्षण करतात. अश्या गुणांसाठी माशे प्रचलित आहेत.

केस वाढविण्यासाठी मदत करतात - 
केस गळण्यापासून रोखण्यासाठी मासे खावेत कारण यामध्ये ओमेगा ३ आहे की जे केस गळणे कमी करते. याशिवाय मासे खाण्यामुळे शरीराला खूप सारे प्रथिने आणि जीवनसत्त्व मिळतात. माश्यांना प्रथिनांचा ऊर्जास्त्रोत म्हटलं जात.

डोळ्यांची काळजी - 
मकुलार डीकॉम्पोझिशन सारखे आजार दृष्टीदोष आणि आंधळेपणा याच मुख्य कारण आहे. ही एक अशी अवस्था आहे की जशे जशे वय वाढत जाते हा आजार वाढत जातो. परंतु काही संशोधनाअंती हे सिद्ध झालं आहे की माश्यातील ओमेगा ३ फॅटी असिड मूळे या समस्येतून मुक्तता मिळू शकते. काही तज्ज्ञांच्या मते नियमित मस्य सेवनाने अंधपणाची शक्यता ४२ टकक्यांपर्यंत कमी होऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने