हि आहेत दारिद्रय मागे लागण्याची काही कारणे...


आपण कितीही धार्मिक किंवा आध्यात्मिक असलो तरी पैशाची आवश्यकता आपण नाकारू शकत नाही. संसारात राहणार्या प्रत्येकासाठी पैशाचे महत्त्व आहे. कारण पैशाने केवळा सुख सोयीच उपलब्ध होतात असे नाही तर त्याने जीवनात सुरक्षितता आणि शांतीही मिळते.


धन संपत्तीविषयी भारतीय मनीषींनी खूप महत्त्वपूर्ण बाबी सांगून ठेवल्या आहेत. त्या गोष्टी आपण समजून घेऊन जीवनात आचरल्या तर लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहील. लक्ष्मी घरातून पळून जाण्याची म्हणजे दारिद्य्र मागे लागण्याची काही कारणे आपण येथे पहाणार आहोत.

ज्या घरातून गाय, साधू, अतिथी आणि भीकारी अपमानीत आणि असंतुष्ट होऊन जातात, तिथे लक्ष्मी अधिक काळा थांबत नाही.

ज्या घरात झाड लोट आणि स्वच्छता नसते तिथे लक्ष्मी निवास करीत नाही.

ज्या घरात माता पिता, वडिलधार्याना सन्मान नसतो, तिथून लक्ष्मी पळून जाते.

जिथे आळस, कामचुकारपणा आणि अनागोंदीचे वातावरण आहे, अशा ठिकाणीही लक्ष्मी रहात नाही.

ज्या घरची दारे खिडक्या सूर्योदयानंतरही बंद असतात, तिथून तत्परतेने धनसंपत्ती लयास जाते.
थोडे नवीन जरा जुने