रात्री झोपताना लाइट बंद का ठेवावी? 'हे' आहे आरोग्यदायी कारण!


अनेकांना रात्री लाईट तसाच सुरू ठेवून झोपण्याची सवय असते. रात्री अभ्यास करता करता किंवा एखादे पुस्तक वाचता वाचता झोप लागते व लाईट तसाच रात्रभर सुरू राहतो; परंतु रात्रभर लाईट सुरू असल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. 

एका संशोधनानुसार रात्री लाईट सुरू ठेवून झोपल्यामुळे लाईटच्या किरणांचा परिणाम तुमच्या त्वचेवर व आरोग्यावर होतो. 

आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असते, जे सूर्य आणि चंद्राच्या किरणांमुळे नियंत्रित होत असते; पण कृत्रिम लाईटमुळे या क्लॉकच्या कार्यात अडथळे येत असतात .

रात्री लाईट सुरू ठेवून झोपत असाल तर शरीरात कॅन्सरच्या पेशी एक्टिव्ह होतात. एका संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, रात्री लाईट सुरू ठेवून झोपल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २२ टक्क्यांनी वाढतो. 

रात्री लाईट सुरू असल्यामुळे झोपेतही अडथळे येतात. कारण लाईटमुळे झोप मोडते. रात्री लाईट लावून झोपल्याने त्याचा परिणाम आपल्या मूडवर तसेच हृदयावरही त्याचा परिणाम होतो. 

ब्लडप्रेशर व मेंदूवरही त्याचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे रात्री लाईट लाऊन झोपणे टाळलेलेच चांगले.
थोडे नवीन जरा जुने