पत्नीला असतात गरोदरपणात पती कडून "ह्या" अपेक्षा !गर्भाचा भार स्त्री वाहत असली तरी बाळ संपूर्ण घराचे असते. म्हणून गर्भवती स्त्रीच्या भोवतीचे वातावरण प्रसन्न राहील याची काळजी कुटुंबीयांनी घ्यावी. गर्भाची उत्पत्ती होताना व झाल्यानंतर स्त्रिया व पुरुष यांचा आहार-विहार, वागणूक, संस्कार, यांचा परिणाम होणा-या गर्भावर होत असतो. त्यामुळे स्त्रीसोबतच्या पुरुषांच्या वागणुकीलाही आयुर्वेदाने तितकेच महत्त्व दिले आहे. 

गर्भसंस्कार स्त्रीद्वारे गर्भापर्यंत पोहोचत असले तरी त्यामध्ये पतीचाही मोठा सहभाग असतो. गर्भारपणात पती-पत्नीचे एकमेकांवर कायमच नीट लक्ष असावे. अशा अवस्थेत स्त्रियांच्या शरीरात सतत होत असणारे बदल लक्षात घेता पतीने तर अधिकच काळजीपूर्वक आपल्या पत्नीकडे लक्ष द्यावे. 

गर्भारपणातील मानसिक व शारीरिक इच्छा यातील फरक या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. स्त्री व पुरुष स्वैच्छेने ठरवून पूर्वतयारी करतील तेव्हाच गर्भधारण आयुर्वेदाला अपेक्षित आहे. तेव्हाच गर्भधारणेची तयारी करणे. 

उत्तम गर्भधारणेसाठी स्त्रीचे आर्तव व पुरुष बीज शुद्ध असणे गरजेचे आहे. आयुर्वेदाने पुरुषांचे बीज शुद्ध होण्यासाठी काही पूर्वकर्म व पंचकर्म यांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये प्रकृतीनुसार दोषांची, क्षयवृद्धीनुसार स्नेहन, स्वेदन हे पूर्वकर्म व वमन विरेचन, बस्ती हे पंचकर्म लाभदायक ठरतात, असे सांगितले आहे. पंचकर्म शरीरशुद्धीनंतर पुरुषांनी मधुर औषधांनी सिद्ध तूप व दुधाचे सेवन करावे. 

गर्भधारणेनंतर स्त्रीमध्ये शारीरिक बदलाबरोबरच मानसिक बदलही मोठ्या प्रमाणावर घडतात. गर्भाबद्दल ममता, जिव्हाळा या भावनाबरोबरच त्याची काळजी, वाढ व्यवस्थित व्हावी ही इच्छा स्त्रीच्या मनात असते. त्यामुळे अशा वेळेस तिला मानसिक आधाराची गरज असते. तो आधार फक्त पतीच देऊ शकतो. 

पत्नी गर्भवती असताना शारीरिक संबंध आपोआपच कमी होतात. पहिले तीन महिने गर्भ अगदी नाजूक व अस्थिर असल्याने ते टाळलेही पाहिजे. अंतिम तीन महिन्यांत तर शारीरिक संबंध टाळावेतच. एकमेकांबद्दल प्रेम व जिव्हाळा हा शारीरिक नसून मानसिक व भावनिक आहे हे लक्षात ठेवा. चौथ्या महिन्यात गर्भ स्थिर होतो. याच महिन्यात गर्भ शरीरातील हृदय व गर्भवतीचे हृदय असे दोन हृदय शरीरात असल्याने तिला ‘दोहृदिनी’ असे म्हणतात. बोलीभाषेत याला डोहाळे म्हणतात. 


बºयाच स्त्रियांना डोहाळे म्हणजे पाणीपुरी, पेढे, चिंच, बोरं, असे आंबट पदार्थ, जे शरीराला अपायकारक असतात ते खाण्याची इच्छा होते. ते पाहता पतीने अयोग्य-योग्य ठरवून डोहाळे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. 

आयुर्वेदानुसार गर्भिणीची इच्छा पूर्ण न केल्यास वाताचा प्रकोप होऊन गर्भास विपरीत परिणाम भोगावे लागतात. प्रसूतीनंतर पतीची जबाबदारी एक पिता म्हणूनही वाढलेली असते. गर्भवती स्त्री प्रसूतीनंतर माता होते. त्यामुळे तिला बाळाबद्दल प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो. त्यामुळे तिचे पतीकडे थोडेफार दुर्लक्ष होते. अशा वेळी पतीने तिला समजून घेणे व तिला शारीरिक व मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक असते. 

प्रत्येक गर्भवती स्त्रीला एक सशक्त मानसिक आधाराची गरज असते. तो मानसिक आधार गर्भारपणात पतीशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नवºयाचे एकच ब्रीद हवे ‘डोंट वरी.... आय अ‍ॅम ऑलवेज देअर विथ यू...’

थोडे नवीन जरा जुने