तुम्हाला तुमचे दात चांगले आणि पांढरे हवे असतील तर,मग हि काळजी घेतलीच पाहिजे !


दातांमुळे तुमच्या लूकमध्ये फरक पडत असतो, दातांवर जर पिवळेपणा असेल, तर ते चांगले दिसत नाही आणि हसताना आपल्याला आत्मविश्वास मिळत नाही. 

पांढरे दात तुमचे सौदर्य खुलवतात. तुम्हाला तुमचे दात चांगले आणि पांढरे हवे असतील, तर त्यासाठी काय कराल?

बेकींग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. त्याने दातांवर ब्रश करा, दातांचा मग पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घ्या आणि दातांवर चोळा दात स्वच्छ होतील.

रोज ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसात थोड पाणी घालून मसाज करा. वाळलेल्या लिंबाच्या सालींची पूड करून ठेवा आणि ती दिवसातून एकदा चोळा, दात चमकायला लागतील.

याशिवाय चहा, कॉफी घेतल्यानंतर चूळ भरा.

रात्री झोपण्यापूर्वी नियमित ब्रश करा. खूप थंड पेय किंवा अन्न सेवन करू नका.
थोडे नवीन जरा जुने