लाल रंगाची फळं आणि भाज्या शरीरासाठी असतात अत्यंत फायदेशीर !


▪ टॉमेटोमध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.

▪ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.

▪ चेरीमध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.

▪ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.

▪ बीटामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.

▪ डाळिंबामध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.

▪ सफरचंदामध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करतं.
थोडे नवीन जरा जुने