जाणून घ्या सोयाबीन खाण्याचे फायदे आणि नुकसान !


सोयाबीन खाण्याचे काही फायदेखील आहेत. मात्र ते जास्त प्रमाणात खाण्यात आले तर महिला पुरुष दोघांनाही याचा त्रास होतो.

हाड होतात बळकटसोयाबीनमुळे हाडे बळकट होतात. महिलांना नेहमी गुडघे आणि कमरेचा त्रास असतो, कमकुवत हाडे किंवा नसांवर दाब पडल्यामुळे त्रास होत असतो. मात्र सोयाबीनच्या सेवनाने हा त्रास दूर होतो. यात विटॅमिन्स, मिनरल्सबरोबरच कॅल्शियम, मॅग्निशियम आणि कॉपर सारखे पोषक तत्त्व असतात. यामुळे हाडे बळकट होता.
हृदय रोगापासून वाचवतेसोयाबीन डायबेटीस आणि हार्ट डिसिजपासूनदेखील बचाव करते. यामुळे कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो. याच्या सेवनामुळे हृदयासंबंधी आजार जसे हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होतो.
हॉर्मोनच्या समस्या वाढतातसोयाबीनच्या अधिक सेवनामुळे महिलांमध्ये हॉर्मोनच्या समस्या वाढतात. पुरुषांनी जास्त प्रमाणात खाल्ले तर स्पर्म संबंधी समस्या वाढतात. त्यामुळे साेयाबीनचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. ज्या लोकांना सोयाबीनची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी खाणे टाळावे. या व्यतिरिक्त कुणाला किडनी संबंधी समस्या असतील किंवा डायबिटीज असेल तर सोयाबीन खाऊ नये.
थोडे नवीन जरा जुने