गर्भावस्थेत खा अ‍ॅलर्जीकारक पदार्थ, बाळाला होईल फायदा...


स्तनपान हे नवजात मुलासाठी फारच महत्त्वाचे ठरते. एक संशोधन असा दावा करीत आहे की, स्तनपानामुळे मुलांचे फूड अ‍ॅलर्जीपासून रक्षण होते. गर्भावस्थेदरम्यान जर मातेने अ‍ॅलर्जीकारक आहार घेतला, तर तिच्या होणा-या बाळाला लाभ होतो. 


मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जेव्हा एखादी गर्भवती फूड प्रोटीनच्या संपर्कात येते, तेव्हा ते तिच्या अँटीबॉडीच्या बरोबर मिसळते व नंतर स्तनपानाद्वारे मुलापर्यंत पोचते. स्तनपानामुळे मुलामध्ये फूड अ‍ॅलर्जीरोधक क्षमता विकसित होते. 

यामुळे मुलाच्या रोगप्रतिकार क्षमतेवर प्रभाव पडतो आणि प्रोटेक्टिव्ह प्रतिरक्षा पेशींचे निर्माण होते, ज्यामुळे मुले फूड अँलर्जीपासून बचाव करू शकतात.
थोडे नवीन जरा जुने