कोंड्याने त्रस्त असाल तर, 'हे' घरगुती उपाय करून पहा !


डँड्रफ किंवा डोक्यातील कोंड्याने अनेकजण त्रस्त असतात. त्वचेतील मृत पेशींपासून कोंडा तयार होतो. वातविकारामुळेही कोंडा तयार होतो. कोंड्यामुळे डोक्यात खाज सुटते आणि केसही गळतात. शँपू, तेल आदीने कोंडा पूर्णपणे दूर होत नाही. 

शँपूचा वापर थांबविला की कोंडा पुन्हा उफाळून येतो. कोंड्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळविण्यासाठी करून पाहा पुढील घरगुती आणि पारंपरिक उपाय.

नारळ (खोबरे), एरंडी आणि मोहरीचे तेल समान मात्रेत (प्रत्येकी एक चमचा) घ्या. या तेलाने केसांच्या मुळापासून मालिश केल्यास थोड्या दिवसांमध्ये डँड्रफ नष्ट होईल.


नारळाचे आणि ऑलिव्ह तेल समान मात्रेमध्ये घेऊन यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून या मिश्रणाने १० मिनिट केसांची मालिश करा. त्यानंतर गरम टॉवेल ३ मिनिट डोक्यावर ठेवा. केस धुण्यापूर्वी असे केल्यास डँड्रफ निघून जाईल.


१/२ कप नारळाचे तेल आणि ऑलिव्ह तेल कोमट गरम करून त्यामध्ये ४ ग्रॅम कापूर टाका. या मिश्रणाच्या तेलाने डोक्याची मालिश करावी. आठवड्यातून एकदा या तेलाने मालिश केल्यास थोड्या दिवसांमध्ये डँड्रफ नष्ट होईल.


थोडेसे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे दाणे बारीक करून यामध्ये लिंबाच्या पानांचा थोडासा रस मिसळावा. या मिश्रणाचा लेप डोक्यावर ४ मिनिट लावून ठेवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास केसातील कोंडा नाहीसा होईल.


आवळ्याला केसांचे खास टॉनिक मानले जाते. आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह तेल एकर करून डोक्याची मालिश केल्यास डँड्रफ निघून जाईल.


जास्वंदाचे फुल बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या, ही पेस्ट केसांवर लावल्यास डँड्रफ नष्ट होण्यास मदत होईल.
थोडे नवीन जरा जुने