संगीत ऐकल्याने रुग्णांच्या वेदना होतात कमी...

संगीताचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो.तणाव कमी करण्यासाठी संगीत ऐकले जाते.पण नवीन लागलेल्या शोधानुसार दुःख आणि वेदना कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. संगीता तणाव, चिडचिडपणा, आणि नैराश्याला नाहीसे करण्यासाठीचे औषध आहे.पण एका नवीन संशोधनातून असे आढळून आले की संगीत दुःखाची जाणीव कमी करते. 

केवळ रुग्नांचाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांना आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या स्टाफला सुद्धा संगीतामुळे आराम वाटतो. अल्बार्टा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी काही नवीन तथ्य समोर आणले आहेत. त्यामध्ये आढळून आले आहे की उपचारादरम्यान संगीत ऐकल्याने रुग्णाला कमी वेदना झाल्या. युनिव्हर्सिटीमध्ये मेडिसिन ॲन्ड डेंसिटी फॅकल्टीतील संशोधक लिसा यांनी 3 ते 11 वयातील 42 मुलांना म्युझिकल थेरिपिचे परिणाम समजून घेतले.

संगीत ऐकनाऱ्या रुग्नांना वेदना कमी !

ही सर्व मुले स्ट्रालरी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या पेडियाट्रिक इमर्जन्सी विभागात भरती होते. आणि औषध देताना काहींना संगीता ऐकवले गेले.तर काहींना संगीत ऐकवले गेले नाही.या दरम्यान त्यांची भीती दुखण्याच्या जाणिवेचे स्तर आणि हृदयाची गती हे मोजण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपस्थित रुग्णाचे पालक आणि स्वास्थ्य कर्मचाऱ्यांच्या संतुष्टपणाचा स्तर त्यांचेसुद्धा आकलन केले गेले. असे आढळले की संगीता ऐकनाऱ्या रुग्नांना वेदना कमी जाणवल्या.
थोडे नवीन जरा जुने