हे आहेत मशरुम खाण्याचे आरोग्यदायी फायदे.मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढी साठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत : 


याद्वारे शरीरात अँटीव्हायरल घटक आणि प्रथिनांचे प्रमाण वाढतं. जे शरीराच्या पेशींची देखभाल करते.


चयापचय सुरळीत होते : 

मशरूममध्ये जीवनसत्त्व ब - २, ब - ३ असते, जे चयापचयाची क्रिया सुधारण्यास साहाय्यक ठरते. 

लठ्ठपणापासून बचाव : 

मशरूममध्ये लीन प्रोटीन असते, जे लठ्ठपणा कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.हिमोग्लोबिन वाढते : 

यामध्ये फॉलिक एसिड भरपूर प्रमाणात असते, जे मांसाहारी भोजनातून प्राप्त होते. शाकाहारांसाठी मशरूम हा चांगला स्रोत आहे. 

सावधगिरी महत्त्वाची - 

जास्त प्रमाणात मशरूमचं सेवन करण्याने एलर्जी होऊ शकते, गर्भवती महिला व स्तनपान करणा-या महिलांनी मशरूमचं सेवन करू नये. छोट्या मुलांसाठी मशरूम हानिकारक ठरू शकतात. नेहमी ताजे आणि न धुतलेले मशरूम घ्या, घरी स्वच्छ करा.
थोडे नवीन जरा जुने