असे दहा करियर ऑप्शन ज्यामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते !


करियर निवडीच्या बाबतीत आपण अनेकदा साशंक असतो. जे करियर आपण निवडणार आहोत त्याला भविष्यात किती मागणी असेल याबाबतीत आपण चिंतीत असतो. आज आम्ही तुम्हाला असे दहा करियर ऑप्शन सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते. 

ऍप डेव्हलपर्स 
ऍप डेव्हलपर्स होण्याचा निर्णय उत्तम ठरू शकतो कारण आजच्या या इंटरनेटच्या युगात या गोष्टींना खूप मागणी आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपर्सया अत्याधुनिक युगात जीवनाच्या गरजेनुसार जीवन सोपे बनवण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर ची गरज असते . त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर ला बाजारात मोठी मागणी आहे.

डेटा एनलिस्टजसजसे तंत्रज्ञान विकसित होईल तसतसा डेटा बदलेल आणि वाढेल . या वाढीव डेट्याचे योग्य विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची गरज पडणार आहे . त्यामुळे हा कोर्स फायदेशीर ठरू शकतात.

वेलनेस एक्स्पर्ट करियर एक्स्पर्ट अस मानतात कि येणाऱ्या काळात ब्यूटीशियन, फिटनेस ट्रेनर, कौन्सिलर्स आणि थेरपिस्ट सारख्या एक्स्पर्ट लोकांची खूपच गरज भासणार आहे त्यामुळे तयार राहा.

स्मार्ट होम इंजिनियर्स पुढे जाऊन घर सुद्धा स्मार्ट होणार आहेत . पाश्चिमात्य देशांत ही सुविधा पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. आता तो काळ पण जास्त दूर नाही जेव्हा या सगळ्या गोष्टी भारतात सुरु होतील. त्यामुळे स्मार्ट होम इंजिनियर्सला भविष्यात डिमांड असेल.

3डी डिझायनर्सयेणारा काळ हा व्हर्च्युअल रियलिटीचा आहे. चित्रपट 3डी असतात, टीव्ही3डी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात थ्रीडी इंजिनियर्सना कमाई करण्याच्या खूप संधी उपलब्ध होणार आहेत.

कन्स्ट्रक्शन एक्स्पर्ट येणाऱ्या काळात जगात खूप मोठे बदल होणार आहेत . जागा कमी असणार आहे आणि गरज जास्त. त्यामुळे घरबांधणीचे प्रकार सुद्धा बदलावे लागतील. त्यामुळे तयार रहा येणारा काळ तुमचा आहे.

प्राथमिक शिक्षकया घडीला सुद्धा प्राथमिक शिक्षकांची गरज आहे. आणि येणाऱ्या काळात तर ही मागणी अधिकच वाढू शकते कारण जग कितीही ऍडव्हान्स झाले तरी लहान मुलांसाठी शिक्षकांची गरज भासणारच आहे.

सेल्स मॅनेजरतुमच्याकडे जर एखादी गोष्ट विकण्याची कला असेल तर तुमचे भविष्य उज्वल आहे . कारण भविष्यात ज्या वस्तूंचे उत्पादन होईल त्यांना विकण्यासाठी एक सेल्स मॅनेजर पाहिजे. त्यामुळे भविष्यात सेल्स मॅनेजरची डिमांड कमी होणार नाही.

नर्सहा एक असा पेशा आहे ज्याची मागणी आजही कमी नाही. आणि येणाऱ्या काळात सुद्धा यात काही बदल होण्याची चिन्हे दिसत नाही. खासकरून भारतात कारण येणाऱ्या काही दशकात वयोवृद्धांच्या संख्येत वाढ होणार आहे.

हे ते 10 करियर ऑप्शन आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार व आवडीनुसार निवडून तुमचे भविष्य घडवू शकता.
थोडे नवीन जरा जुने