दुधामध्ये दालचिनी टाकून पिण्याने होतील हे फायदे !


लठ्ठपणा कमी होतो

यामुळे आजारांपासून तर बचाव होतोच आणि लठ्ठपणाही कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करणाऱ्या लोकांनी कमी फॅट असलेल्या दुधात दालचिनी मिसळून पिणे फायदेशीर होईल. या दुधात सिनेमेल्डिहाइड असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

सर्दी-पडशापासून आराम

यात असणारे अँटिमायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण सर्दी-पडसे ठीक करते. जर तुम्हाला घशाचे दुखणे असेल किंवा टॉन्सिल्सचा त्रास असेल तर हे दूध तुमच्यासाठी फायदेशीर आहे. हे दूध रात्री झोपण्यापूर्वी अवश्य प्यावे.

केसांच्या मजबुतीसाठी

यात असणारे अँटिबॅक्टेिरयल आिण अँटिइंफ्लेमेटरी गुणांमुळे त्वचेचे इन्फेक्शन दूर करण्यास मदत होते. ज्या लोकांचे केस पातळ आहेत किंवा अकाली पांढरे होत असतील त्यांना हे दूध प्यायल्यास फायदा होतो.

मधुमेहापासून बचाव करते

बऱ्याच संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की, दालचिनीमध्ये कित्येक असे कंपाउंड असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. हे दूध विशेषत: टाइप -२ डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.

हाडांना मिळते बळकटी

हाडांच्या मजबुतीसाठी दालचिनीचे दूध पिणे फायदेशीर आहे. या दुधाचे नियमितपणे सेवन केल्यास सांधेदुखीपासून बचाव होतो. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते आिण हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
थोडे नवीन जरा जुने