वजन पुन्हा वाढू नये यासाठी काही साधे उपाय जाणून घ्या !ठणठणीत राहण्यासाठी फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही. पुन्हा वजन वाढू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आहाराचे वेळापत्रक आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी आधी साधा प्लॅन तयार करा. 


काही काळानंतर त्यापेक्षाही चांगला प्लॅन करता येईल. जेवणाचा कंटाळा न येता आपल्याला जेवण करायला उत्साह वाटेल, असेच आहाराचे वेळापत्रक तयार करा.

चयापचय प्रक्रिया मंदावल्यास वजन वाढते. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण व्यायाम करत असतो, मात्र पौष्टिक आहार घेत नसतो. त्यामुळे इन्सुलिनचे योग्य प्रमाण राखले जात नाही. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

वजन पुन्हा वाढू नये यासाठी काही साधे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

आनुवंशिकतेमुळेही वजन वाढते. अंडरअँक्टिव्ह थायरॉइड असल्यास वजन वाढते. हार्मोन्सचे असंतुलन हे यामागील प्रमुख कारण असते.


आहाराचे वेळापत्रक पाळताना शिस्तीत जगणेही महत्त्वाचे. मात्र मित्र, कुटुंबातील सदस्य चांगल्या सवयी बिघडवून टाकतात. स्वत:वर नियंत्रण ठेवा.


वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे, हा उपाय नव्हे. भूक लागल्यावर कच्चे अन्न, भाज्या, हंगामी फळे खा. शंभर टक्के होलग्रेनने तयार केलेला ब्रेड किंवा रोटी खा. 


नाष्ट्यात कडधान्ये, दही आणि पातळ पदार्थ खा. आहारात बिघाड झाल्यास शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवते. खूप वेळ बसल्याने स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार, ओस्टिओपोरोसिससारखे जीवनशैलीसंबंधीचे आजार उद्भवतात.


जगभरातील शाकाहारी लोकांचे वजन नियंत्रित असते. मात्र आपल्या देशात असे नाही. कारण भारतातील शाकाहारी लोकांच्या जेवणात सलाड, फळांऐवजी तेलकट, अति कर्बोदकेयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात.
थोडे नवीन जरा जुने