दैनंदिन जीवनात कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच आयुष्यात यशस्वी व्हाल !


कोणतेही काम वेळच्या वेळी केले तरच त्याचे फळ चांगले मिळते. माणसाचे आयुष्यही घड्याळाच्या काट्यावर अवलंबून असते. त्यानुसार मानव दैनंदिन जीवनात वावरत असतो. वेळही माणसाच्या आयुष्यात त्याच्या जगण्यानूसार प्रमाण दाखवत असते. 

तुम्ही वाट पाहात असता तेव्हा वेळ अगदी मंदगतीने पुढे सरकत असतो. 

जेव्हा तुम्हांला उशीर झालेला असतो तेव्हा वेळ वेगाने धावत असतो.

तुम्हाला वेदना होत असतात तेव्हा वेळ थांबून राहिला आहे असे वाटते. 

जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा वेळ ही गोष्ट फार भयंकर वाटू लागते.

जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा वेळ कसा पटकन निघून जातो.

तुम्हाला कंटाळा आलेला असतो तेव्हा वेळ जाता जात नाही.

प्रत्येकवेळी तुमच्या भावनांनुसार आणि मानसिक स्थितीनुसार वेळेची व्याख्या ठरत असते, घड्याळानुसार नव्हे.

तेव्हा नेहमीच तुमचा वेळ चांगला जावो.
थोडे नवीन जरा जुने