केसांच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करा.

हल्ली केसांच्या समस्या वाढीस लागल्याचं पाहायला मिळतं. त्यात अकाली केस पांढरे होण्याची तसंच केसांच्या गळतीची समस्या तरुणाईसाठी विशेष चिंताजनक ठरते. वास्तविक अशी स्थिती उद्भवू नये म्हणून अगोदरच लक्ष द्यायला हवं. 

केसांच्या आरोग्यासाठी रोज दूध प्यावं. दुधात स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केस मुळापासून मजबूत बनतात. केसांवरही दुधाचा वापर करता येतो, दुधात मध आणि मेथीच्या दाण्यांची पावडर मिसळून हेअर मास्क म्हणून वापर करता येतो. दुधाप्रमाणेच अंडेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहार आहे. अंड्यामध्ये प्रथिने आणि आवश्यक अमिनो आम्लं असतात. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय केसांना बाहेरून लावण्यासाठी ऑलिव ऑईल उत्तम समजलं जाते. त्यात नरिशिंग, मॉयश्चरायझिंग आणि कंडिशनिंग हे घटक असतात.

 त्यामुळे केस लवचिक, कोमल आणि मजबूत बनतात. हे तेल केसांना लावल्यास कोरडेपणा आणि गुंता लगेच दूर होतो, केस रेशमी आणि मुलायम बनतात. आहारात कच्च्या भाज्यांचा समावेश केल्यानेही केसांचं आरोग्य सुधारतं. रोजच्या आहारात कोशिंबीर आवर्जून घेतल्यास त्या भाज्यांमधील जीवनसत्त्वं, खनिजं आणि शरीराला नैसर्गिक स्थितीत अ‍ँटीऑक्सिडंट्स उपलब्ध होतात. एरव्ही या भाज्या शिजवल्यावर हे सर्व घटक नष्ट होतात. 

म्हणून नैसर्गिक अवस्थेत विशेष उपयुक्त ठरणाऱ्या भाज्या किंवा कंदमुळे न शिजवता खाल्ल्या पाहिजे. एका संशोधनानुसार आहारातील शंभर टक्के बदलही केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो असं दिसून आलं. आठवड्यातून एक दिवस एक वेळच्या भोजनात फक्त फळे खाणे, आठवड्यातून एक दिवस दररोजचं मीठ बदलणे (साध्या मिठाऐवजी काळे मीठ इ.), ठरावीक अंतराने पंचकर्म या बाबीही केसांच्या आरोग्यासाठी पोषक असल्याचे सिद्ध झालं आहे
थोडे नवीन जरा जुने