अशा प्रकारे करा लिंबाचा उपयोग,दात होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत !


दात फक्त अन्न चावण्यासाठी मदत करत नाहीत तर यामुळे तुमच्या लुकमध्येही बदल होतो. दातांवरील पिवळसरपणा कोणाच्याही सौंदर्यात कमतरता आणू शकतो. 

मजबूत आणि पांढरेशुभ्र दात असल्या व्यक्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तुम्हाला तुमचे दात मजबूत आणि पांढरेशुभ्र ठेवण्याची इच्छा असेल तर लिंबाचा उपयोग करून पाहा. लिंबाच्या उपायाने पिवळे दातही पांढरेशुभ्र आणि मजबूत होतील.

लिंबाचे उपाय - 
दररोज दोन वेळेस ब्रश करा. ब्रश केल्यानंतर लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पाणी मिसळून दातांवर मालिश करा.

वाळवलेल्या लिंबाच्या सालीचे चूर्ण करून ठेवा. या चुर्णाने दात घासल्यास दात चमकदार होतील.

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट तयार करा. या पेस्टने दान घासल्यास दातांवरील पिवळसरपणा दूर होईल.

एक चमचा लिंबाच्या रसामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून दात घासल्यास, दात एकदम स्वच्छ होतील.


ज्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन 'ए' जास्त प्रमणात आढळते, अशा भाज्या दातांसाठी लाभदायक असतात. उदाहरणार्थ ब्रोकली, भोपळा, गाजर जास्त प्रमाणात खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. यामुळे दात पांढरे आणि चमकदार होतात.

हिरड्या आणि दात मजबूत करण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे चांगले आहे. सफरचंद खाल्याने दातांची स्वच्छता होते. तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते ज्यामुळे दातांमध्ये कीड निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात.
थोडे नवीन जरा जुने