'ही' भाजी रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍याबरोबरच विविध आजारांवर उपाय आहे,जाणून घ्या !भोपळ्याची भाजी आहारात वापरली जाते, मात्र ही भाजी सर्वांना आवडत नसल्‍यामुळे आहारात भोपळ्याच्‍या भाजीचा पाहिजे तेवढ्या प्रमाणात वापर केला जात नाही. आरोग्‍यासाठी भोपळ्याची भाजी लाभदायक असते, यासंदर्भात माहिती नसल्‍यामुळे आहारात या भाजीचा वापर केला जात नाही. 


रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍याबरोबरच विविध आजारांवर उपाय करण्‍यासाठी भोपळा लाभदायक ठरतो. भारत देशात विविध राज्‍यात भोपळ्याच्‍या वेगवेगळ्या प्रजाती पहायला मिळतात. 

भोपळ्याचे विविध आकार असल्‍यामुळे विविध भाषेत भोपळ्याची वेगवेगळी नावे आहेत. उपवासासाठी फराळ म्‍हणून भोपळ्याचा आहारात उपयोग केला जातो.

अंटार्क्‍टिका खंडामध्‍ये विविध प्रकारच्‍या भोपळ्याच्‍या प्रजाती पहायला मिळतात. भोपळ्याचा शोध सर्वात अगोदर लॅटीन अमेरिकेत लागला. इ.स.पुर्व 7000 ते 8000 वर्षापूर्वीपासून भोपळ्याच्‍या विविध प्रजाती उपलब्ध असल्‍याचे तज्ज्ञाचे मत आहे. 

भारत,चीन, मॅक्सिको, अमेरिका या देशात भोपळ्याचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन केले जाते. पोट, हृदय, मुत्रपींडाचे आजारावर भोपळा लाभदायक उपाय म्‍हणून वापरला जातो. भोपळ्याचा रस आरोग्‍यासाठी लाभदायक असल्‍याचे आर्युवेदात सांगण्‍यात आले आहे.

भोपळ्यामध्‍ये व्हिटामिन्‍स सी, ई, आयर्न, कॅल्शियम, पोटॉशियम, जिंक, प्रोटीन्‍स, फायबर यासारखे महत्वाचे घटक असल्‍यामुळे भोपळा आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. शक्‍ती वर्धक फळ म्‍हणून भोपळा ओळखला जातो. शिवाय रक्‍त शुद्ध करण्‍याचे काम भोपळा करतो. 

गॅस, ऑसिडिटी यासारख्‍या समस्‍यांवर सोपा आणि चांगला उपया म्‍हणून भोपळ्याचा उपयोग करता येतो. यामुळे प्राचीन काळापासून भोपळा औषधी वनस्‍पती म्‍हणून ओळखला जातो. भोपळ्यात बीटा कॅरोटीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहयला मिळते. भापळ्यात बीटा कॅरोटीन असल्‍यामुळे फ्री रॅडिकलपासून शरीराचा बचाव करण्‍याचे काम भोपळा करतो.


तळपायाला भोपळा कापून घासल्‍यांनतर शरीरातील उष्‍णता कमी होते. ताप आल्‍यानंतर भोपळ्याची भाजी आहारात घेणे लाभदायक ठरते. शरीरात रक्‍ताचे प्रमाण कमी असेल तर भोपळ्याचा वापर आहात केल्‍यामुळे शरीरातील रक्‍त वाढते. हृदयाच्‍या रोगाबरोबरच मेंदूला आराम देण्‍याचे काम भोपळा करातो. भोपळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्‍यामुळे 'कफ' झाला असेल तर भोपळ्याची भाजी आहारात घ्‍यायला हवी. शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलीत ठेवण्‍याचे काम भोपळा करतो.
थोडे नवीन जरा जुने