अपचानाने त्रस्त असाल तर मग हे नक्की करा .


आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत.
आयुर्वेदामध्ये मानवी शरीर आणि मनाशी निगडीत अनेक आजारांवर अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. पावसाळ्यात भूक मंदावल्याच्या तक्रारी सर्रास ऐकू येतात. आयुर्वेदामध्ये पचनसंस्था कार्यक्षम राहण्यासाठीच्या अतिशय साध्या सोप्या बाबी सांगण्यात आल्या आहेत. 


जेवणापूर्वी एक तास पंचसकार चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. असे केल्याने भूक चांगली लागते.
रात्री झोपताना 3 भाग आवळा, 2 भाग हरड आणि 1 भाग बहेडा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. जठराग्नी प्रदीप्त होते.

जेवणात पातळ अन्नपदार्थांचा समावेश असू द्या. यामुळे खाल्लेले लवकर पचते.

जेवणानंतर एक चमचा हिंग्वाष्टक चूर्ण खा. पचनक्रीया सुधारते.

एक पेला ताक प्या. पचनशक्ती वाढते.

जेवल्यानंतर काही काळ वज्रासनात बसा. जेवल्यानंतर करता येणारे हे एकमेव आसन आहे.
थोडे नवीन जरा जुने