मध खाताना "ह्या" काही बाबींकडे दुर्लक्ष करू नका...


मध हे औषधी आहे. शरीराला उपकारक आहे. परंतु मध खाताना आपण काही बाबींकडे दुर्लक्ष केले तर मध हानीकारकही ठरण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा केव्हा मध खाल तेव्हा पुढील गोष्टी सदैव ध्यानात ठेवा.

चहा आणि कॉफी आदी पेयांसोबत मध घेऊ नका. 

- ऊस, द्राक्ष, पेरू आणि आंबट फळांसोबत मध खाणे अमृत खाल्लयासारखे आहे.

- शरीराला आवश्यक असणारे लोह, गंधक, मॅगनीज, पोटॅशियम आदी खनिज द्रव्ये मधात असतात.

- एक चमचा मधात 75 ग्रॅम कॅलरी ऊर्जा असते.

- काही कारणाने मध खाल्ल्याने त्रास झाला तर लिंबू खा.

- मध कधीही तापवू नका.

- मांस, मासे यासोबत कधीही मध खाऊ नका.
 
- मधासोबत पाणी किंवा दूध घेणे हानीकारक आहे.

- मधात साखर मिसळणे म्हणजे अमृतामध्ये विष कालवल्यासारखे आहे.

- थंडीच्या दिवसात मध हे कोमट दूधासोबत किंवा पाण्यासोबत घेतले तर चांगले.

- एकाच वेळी अधिक मध खाऊ नका. दिवसातून दोन तीन वेळी एक एक चमचा मध घ्या.

- तूप, तेल आणि लोणी यासोबत मध म्हणजे विषच समजा.

थोडे नवीन जरा जुने