'हे' आहेत मक्याचे कणीस खाण्याचे फायदे घ्या जाणुन...


मक्याची शेती संपुर्ण भारतात केली जाते. याच्या दान्यांनी भजी आणि असे अनेक पदार्थ बनवता येतात. मक्याचे कनीस भाजून खाल्याने तर खुपच स्वादिष्ट लागतात. ते पौष्टीक असतात. मक्याचे वानस्पतीक नाव जिया मेज आहे. अदिवासी मक्याला एक पूर्ण आहार मानतात. 

एखादा कोणी आजारी असेल, रक्त कमी असेल किंवा अशा अनेक समस्यांसाठी अदिवासी मक्याचा भरपूर वापर करतात. चला तर मग जाणुन घेऊया अदीवास्यांचे काही उपाय...

1. मक्याचे दाने उकडून खाल्ल्याने पोट मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम करते. असे म्हटले जाते की, ज्याला रक्ताची कमतरता आहे त्यांने महिण्यातुन एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहीजे. असे केल्याने ही समस्या पुर्णपणे दूर होईल.

2. मक्याचे कणीस जाळुन त्याची राख तयार करा. यानंतर हे बारीक करुन त्यामध्ये चवीसाठी काळे मीठ टाका. आता हे दिवसातुन एक चमचा खाल्ल्याने खोकला, कफ आणि सर्दीपासुन आराम मिळतो.

3. कनीस स्वच्छ करुन पिण्याच्या पाण्यात उकडा. मक्का उकडल्यानंतर हे पाणी एक ग्लासमध्ये घ्या. यामध्ये मध मिळवा. अगोदर मक्याचे दाने चावा आणि नंतरच हे पाणी प्या. हे किडनी आणि मूत्रतंत्रला चांगले बनवते. किडनीच्या स्वच्छतेसाठी हा उत्तम उपाय आहे. अदिवासींच्या म्हणण्यानुसार असे केल्याने मुतखडा होण्याची शक्यता कमी होते.

4. पातालकोटच्या अदिवासींनुसार 20 ग्राम मक्क्याची दाने कुस्करुन एक ग्लास पाण्यात उकळा. जेव्हा हे पाणी अर्धे होईल तेव्हा यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण दिवसातुन दोन वेळा लहान मुलांना प्यायला दिल्याने ते अंथरुवर मूत्रविसर्जन करणार नाही.

5. डांग- गुजरातच्या अदिवासीं नुसार मक्क्याचे दाने काढल्यानंतर उरलेल्या मक्याला जाळुन राख करा. आणि चिमुठभर राख मधासोबत मिळवुन दिवसातुन 2-3 वेळा खा. खोकला दूर होतो. काही अदिवासी या उपायाचा उपयोग हृदयरोग दूर करण्यासाठी देखील करता. परंतु येथे मधाच्या जागी लोणीचा वापर केला जातो.

6. पातालकोटच्या अदिवासीं नुसार 40 ग्राम मका अर्धा लिटर पाण्यात उकळा आणि जेव्हा हे अर्धे होईल तेव्हा याला गाळुन प्या. यामुळे मुत्रपिंडाचे रोग दूर होतील.

7. ताज्या मक्याच्या कनीसांना पाण्यात उकळा. यानंतर गाळुन यामध्ये मिश्री मिळवुन प्यायल्याने मूत्रविसर्जनाची आग आणि मुत्रपिंडचा कमकुवतपणा दूर होतो.

8. अदिवासींच्या म्हणण्यानुसार टी.बी.चा रोग दूर करण्यासाठी रुग्णाला मक्याची भाकरी खाऊ घातल्याने फायदा होतो. तसे तर अदिवासी लोक ताप उतरल्यानंतर रुग्णाला मक्का अवश्य खाऊ घालतात. असे म्हटले जाते की, मका एक पूर्ण आहाराप्रमाणे काम करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते.
थोडे नवीन जरा जुने