गर्भावस्थेत महिलांनी जेवणाच्या बाबतीत हि काळजी घेतलीचं पाहिजे...गर्भधारणेच्या दुस-या - तिस-या महिन्यात गर्भवतीला वेगवेगळे पदार्थ हवेत खाण्याची इच्छा होते. अनेकदा या इच्छेला सामान्यतः डोहाळे असं म्हणतात. 


याची तीव्रता एवढी असते की, तो पदार्थ खाल्ल्याशिवाय मनाला शांतता मिळत नाही. गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे रासायनिक बदल होतात. 

ज्यांना वैद्यकीय भाषेत हार्मोनल बदल असं म्हणतात. शरीरात होणा-या हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची इच्छा होते. 

डोहाळ्यांचं दुसरं कारण असं की, शरीरात ज्या घटकांची कमतरता आहे, तेच खाण्याची तीव्र इच्छा डोहाळ्यांच्या माध्यमातून होते. 

यामुळे वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. डोहाळ्यांच्या दरम्यान कोणते पदार्थ खाणं टाळायला हवेत, याविषयी..

केकचं मिश्रण व कच्ची कणिक : गर्भवती महिलांना केकचं न बेक झालेलं ताजं बटर किंवा मिश्रण खूप स्वादिष्ट लागतं. पण कच्चे मिश्रण आणि कच्चे पीठ गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरतं. कारण त्यामध्ये कच्चे अंड असतं. कच्च्या अंड्यामध्ये सैल्मोनेला आणि अन्य हानिकारक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे गर्भवती महिलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. तसेच गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.

जंक फूडची इच्छा : जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक ठरते. विशेषतः गर्भवती महिलांनी जंक फूड पासून दूर रहायला हवं. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत, ज्यामुळे भ्रुणाच्या विकासात बाधा येते.

पॅक्ड सलादपासून दूर रहा : गरोदरपणात सलाद खाणं उत्तम. पण सलाद ताजं असायला हवं. म्हणून पॅक्ड सलादपासून दूर रहा.

कॅफिनपासून दूर रहा : जर तुम्ही गर्भवती असाल तर तुमच्या दिवसाची सुरुवात नारळ पाणी, ज्यूस, दूध याने व्हायला हवी. चहा किंवा कॉफीचं सेवन टाळा.
थोडे नवीन जरा जुने