असा दीर्घ श्वास एकदा घ्याच...सर्व प्रोब्लेम्स मुक्त होण्यास मदत होईल ...


डीप ब्रिदिंग म्हणजेच दीर्घ श्वास घेण्याचे एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. उत्तम आणि निरोगी जीवन जगण्याचे हे एक मोठे तत्त्वज्ञान आहे. श्वास घेण्याच्या विविध तंत्राच्या माध्यमातून आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. 

दीर्घ श्वास घेणे शरीरासह मेंदूसाठीही महत्त्वपूर्ण आहे. जाणून घेऊया यापासून होणा-या फायद्यांच्या बाबतीत.


रक्तप्रवाह वाढतो : श्वासामुळे चयापचय क्षमता चांगली राहते आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीही श्वास घेणे फायद्याचे आहे. श्वासामुळे अंतर्गत अवयवांमध्ये होणारा रक्तप्रवाह वेगाने होतो आणि अवयवांची कार्यक्षमता वाढते.

विषारी घटकांपासून मुक्ती : 


शरीरात भरपूर ऑक्सिजन पोहोचल्याने 70 टक्के विषारी पदार्थांपासून आराम मिळतो. पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने मेंदू आणि सर्व अवयवांची कार्यप्रणाली चांगली राहते. तसेच विविध रोगांची शक्यता कमी करण्यासाठीही श्वासाचा व्यायाम फायदेशीर आहे.

तणावमुक्ती : राग आल्यावर


किंवा तणाव असल्यावर शरीराचे स्नायू घट्ट व्हायला लागतात आणि श्वास घेण्याचा वेग मंदावतो. अशावेळी शरीरात ऑक्सिजनची पूर्तता कमी होते. मात्र, नियमित ब्रिदिंग केल्याने तणाव नियंत्रणात राहतो.

स्टॅमिना वाढतो : 

ब्रिदिंग केल्याने शरीराचा स्टॅमिना वाढतो. तसेच यामुळे लवकर थकवा येण्यासारख्या लक्षणांपासूनही सुटका होते. सोबतच शरीराच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

इन्फेक्शन होत नाही : 

नाकाने श्वास घेतल्याने हवा फुप्फुसांमध्ये पोहोचल्यावर आधी ती गरम होते. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी राहते. तसेच नाकात असलेले छोटे-छोटे केस धुळीचे कण आणि हानिकारक जीवाणू फुप्फुसांमध्ये जाण्यापासून रोखतात.

असे करावे ब्रिदिंग श्वासाला नियमित करणे हा ब्रिदिंगचा प्रमुख उद्देश आहे. 


ब्रिदिंग व्यायाम खोल, मंद आणि लयीत असावा. जाणून घेऊया या व्यायामाचे तंत्र.. नाकाद्वारे खोल श्वास घ्या आणि पोट फुलवत छातीत हवा भरा. पाचपर्यंत आकडे मोजेपर्यंत असे करा.  

आता हळूहळू श्वास सोडा. या वेळी शरीराच्या प्रत्येक पेशी आपले विषारी घटक सोडत आहेत, अशी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा.शक्यतो सकाळच्या वेळेत हा प्रयोग करणे आवश्यक. 
थोडे नवीन जरा जुने