'ही' पेय आहेत लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त .लठ्ठपणा ही आजच्या जीवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. आजकाल प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाने ग्रासलेला दिसतो.बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा त्याला जाग येते पण त्यावेळेस उशिराही झालेला असतो. 

लठ्ठपणाने माणसाचे आरोग्य धोक्यात येऊन मधुमेह, कॅन्सर, सांधेदुखी, यांसारख्या आजाराला बळी पडले आहेत .तरीही तम्ही ही पेय पिल्याने लठ्ठपणापासून मुक्तता मिळवू शकता.

पाणी.
आरोग्याला सर्वात फायदेशीर कोणते पेय असेल, तर ते म्हणजे पाणी. पाण्याला जीवन म्हटले जाते ते खरेच आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे अनेक शारीरिक अडचणींपासून सुटका होते. यामध्ये थोड्या प्रमाणात लिंबू पिळल्यास तेही फायदेशीर ठरू शकते.व्हेजिटेबल सूप.
जंकफूड खाण्याऐवजी व्हेजिटेबल सूप घेणे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे आपण आहारातून घेत असलेल्या कॅलरीज कमी होण्यासही मदत होते, तसेच सर्व भाज्या शरीरात जातात ज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.


काळी कॉफी
शरीरातील फॅटस बर्न करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम चांगला रहावा यासाठी काळी कॉफी अतिशय उपयुक्त असते. आपण ज्यावेळी आराम करतो त्यावेळी या कॉफीतील कॅफेन हा पदार्थ फॅट्स बर्न करण्याचे काम करतो. त्यामुळे तुम्हाला चहा किंवा कॉफी घेण्याची इच्छा झाल्यास काळी कॉफी घेणे हा अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो.

ग्रीन टी.
ग्रीन टी आरोग्यदायी असतो असे म्हटले जाते, मात्र तो कधी आणि कसा घ्यावा याचेही काही नियम आहेत. ते पाळून ग्रीन टी घेतल्यास तो अतिशय उपयुक्त ठरू शकतो. शरीरातील ग्लुकोज आणि साखर कमी करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. त्यामुळे शरीरातील फॅट्स जळण्यासही मदत होते आणि ग्रीन टी हा वजन कमी करण्याचा उत्तम उपाय ठरतो.

स्कीम्ड मिल्क
दूध हे आरोग्यासाठी कायमच चांगले असते. मात्र त्यातील स्निग्धांश कमी करुन हे दूध घेतल्यास ते नक्कीच आरोग्यदायी असते. जन्मापासून दूध हेच मुख्य अन्न असल्याने ते आयुष्यभर उपयुक्त ठरते. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, जी आरोग्याला उपयुक्त ठरु शकतात. हाडे मजबूत राहण्यासाठीही दूधाचा उपयोग होतो.
थोडे नवीन जरा जुने