अशा प्रकारे बनवा, रुक्ष केसांना चमकदार !


केस सुंदर असले तर व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. मग तो पुरूष असो अथवा महिला सर्वजण आपल्या केसांकडे विशेष करून लक्ष देतात. केस सिल्की आणि सुंदर बनवण्यासाठी विविध प्रॉडक्टचा वापर करतात. 

परंतु या प्रॉडक्टमुळे केसांना नुकसान पोहोचण्याचीसुध्दा भिती असते. त्यामुळे घरगुती उपायच केसांना सुंदर आणि सिल्की बनवण्यास मदत करतात.

केस सुंदर असले तर व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. मग तो पुरूष असो अथवा महिला सर्वजण आपल्या केसांकडे विशेष करून लक्ष देतात. केस सिल्की आणि सुंदर बनवण्यासाठी विविध प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु या प्रॉडक्टमुळे केसांना नुकसान पोहोचण्याचीसुध्दा भिती असते. त्यामुळे घरगुती उपायच केसांना सुंदर आणि सिल्की बनवण्यास मदत करतात. जर तुम्ही तुमच्या रुक्ष केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर पुढील घरगुती उपाय वाचा जे तुमच्या रुक्ष केसांना सिल्की बनवण्यास मदत करेल.

एक कप बीअरला एखाद्या भांड्यात उकळून घ्या त्यातील अल्कोहोलची वाफ झाल्यानंतर बीअरला थंड करून त्यात तुमच्या आवडीचा शॅम्पू मिसळवा. शॅम्पू चांगल्या ब्रँडचा हवा. 

या मिश्रणाला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला केस धुवायचे असल्यास या मिश्रणाने धुवा. काही दिवसांतच तुमचे केस सिल्की आणि चमकदार होतील.

केळी केसांसाठी एक उत्कृष्ट घरगुती उपाय म्हणून ओळखले जाते. केळीची पेस्ट बनवा आणि त्यात मधाचे काही थेंब टाका. ही पेस्ट केसांवना लावा आणि 30 मिनीटांनी केस धुवून घ्या.


केसांना शॅम्पूने धुतल्यानंतर बीअरचे काही थेंब पाण्यात टाका. त्या मिश्रणाने पुन्हा एकदा केस धुवा. बीअरने तुमच्या केसांना चमक येईल आणि मजबूतदेखील होतील.

केसांना चमकदार बनवण्यासाठी, केस धुण्यापूर्वी त्यांना दही लावा. जर केसांमध्ये कोंडा असेल तर दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळवा. असे केल्यास तुमचे केस कोमल आणि चमकदार होतील.

नारळाच्या तेलामध्ये लिंब, तुळस, शिखेकाई. मेथी, आवळा यांचे पान टाकून उकळून घ्या या तेलामध्ये डोक्याची मालिश करा. तुमचे केस सुंदर दिसायला लागतील.
थोडे नवीन जरा जुने