पेनकिलरचे काम करणारे 'हे' उपाय केल्यास तुम्हाला औषध घेण्याची गरज भासणार नाही.


शरीराच्या कोणत्याही अवयवामध्ये वेदना होणे हा आधुनिक जीवनशैलीचा परिणाम आहे. एखादा अवयव दुखत असल्यास रुग्णाला असाह्य वेदना होतात. तुम्हालाही अशाप्रकारच्या वेदना होत असतील तर या वेदना दूर करण्यासाठी काही विशिष्ठ पदार्थांचे सेवन आणि घरगुती उपाय करा. यामुळे केवळ तुमच्या आरोग्याचे रक्षण होणार नाही तर प्रत्येक दुखण्यात औषधीचे कामा करेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. पेनकिलरचे काम करणारे हे उपाय केल्यास तुम्हाला औषध घेण्याची गरज भासणार नाही.


1. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.

2. सुंठ आणि अद्रक एकाच पदार्थाचे दोन रूप आहेत. ओले अद्रक वाळवून सुंठ तयार केली जाते. अद्रक आणि सुंठ यांचा उपयोग मसाला आणि घरगुती औषधीच्या रुपात व्यापक प्रमाणावर केला जातो. हे वात रोगांमध्ये सर्वात उत्तम औषध आहे. शरीरातील एखादा अवयव दुखत असेल तर सुंठ चूर्णाची वाफ घ्या. वेदनेपासून त्वरित आराम मिळेल.


3. जायफळाचे आणि मोहराचे तेल एकत्र करून सांधे आणि सूज आलेल्या ठिकाणी मालिश केल्यास आराम मिळेल. तेलाचे हे मिश्रण संधिवातामुळे आखडलेल्या संधी-स्थळांना मोकळे करते. जायफळ चूर्ण मधासोबत खाल्ल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. जायफळ बकरीच्या दुधामध्ये उगाळून याचे लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल.


4. गाजर खाल्ल्याने शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते. दररोज गाजराचा रस प्यायल्याने सांधेदुखी, जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून संध्याकाळी मान किंवा कंबर दुखणे यामध्ये आराम मिळतो. यामध्ये आवळ्याचा रस मिसळल्यास हे अधूक गुणकारी होते.


5. दुध आणि पाणी समान प्रमाणात घेऊन लसुन आणि वावडिंग त्यामध्ये उकळून घ्या. थोड्यावेळाने दुध गळून थंड करून प्या. या उपायाने मांसपेशी मजबूत होतात. लसुन आणि उडदाचे वाडे तिळाच्या तेलात टाळून खाल्ल्यास संधिवात आणि इतर आजारांमध्ये आराम मिळेल.
थोडे नवीन जरा जुने