साखर शरीरासाठी नुकसानदायक आहे का ? जाणून घ्या सविस्तर...


साखर शरीरासाठी नुकसानदायक असल्याचे आतापर्यंत तुम्ही कोणाचाही तोंडून ऐकले असेल तर तुम्हाला त्यावर विश्वास बसला नसेल, परंतु कॅलीफोर्नियाच्या एका विद्यापीठाच्या संशोधकांनी या गोष्टीला सत्य मानले आहे. 

आतापर्यंत तुम्ही दारू किंवा तंबाखू खाणार्‍या लोकांना व्यसनी समजले असेल, परंतु आता सावध व्हा. जर तुम्ही साखर म्हजेच गोड पदार्थांचे खवय्ये असाल तर कदाचित तुम्हीसुद्धा व्यसनी लोकांच्या श्रेणीत गणले जाल. 

हे आम्ही नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाचे वैज्ञानिक सांगत आहेत. या संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असले अशा सर्व उत्पादनांवर कर आणि कायदेशीर बंधन असणे आवश्यक आहे.

साखरेमुळे शरीराचे होते मोठे नुकसान

वैज्ञानिकांच्या मते साखरेमुळे रक्तदाब वाढतो. तसेच हार्मोन संतुलन बिघडून लिव्हरलासुद्धा नुकसान पोहचू शकते. विविध प्रदार्थांमाद्ये वापरण्यात येणारी साखरल लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर कोला पिण्यापूर्वी या गोष्टीचा अवश्य विचार करा. एक कोलामध्ये 10 चमचे साखर असते. या व्यतिरिक्त चॉकलेट, केक, बिस्कीट यासारख्या पदार्थांमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते.


शुगर फ्री प्रॉडक्टही नसतात सेफ

तज्ज्ञांनुसार आर्टिफिशिअल (कृत्रिम) गोड पदार्थांचा पर्याय आरोग्यासाठी ठीक नाही. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. कारण अशाप्रक्राच्या साखरेतून मिळणार्‍या कॅलरीमुळे व्यक्ती भुकेबद्दल अचेत राहून जास्त कॅलरी घेतो. यामुळे कोणत्या प्रकारच्या शुगर फ्री पदार्थांचे आपण सेवन करत आहोत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
थोडे नवीन जरा जुने