प्रभावी जीवन जगण्याचे हे महत्वाचे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे !


एकटे असण्याची जाणीव आपल्याला बैचेन करते. एकटं वाटल्यामुळे आपण लोकांशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतो. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर शोधू लागतो. ज्यांच्यासोबत खूप काळापासून बोललेलो नसतो.

त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एकटे आहात म्हणून इतरांवर प्रेम करू नका, लोकांचं प्रेम म्हणजे छत्री नाही, जी खूप पाऊस किंवा खूप ऊन असतानाच उघडली जावी. 

काहींना आपला प्रभाव या गोष्टीने समजतो की, ते दुसऱ्यांच्या किती कामी येऊ शकतात, तर काहींना ते दुसऱ्यांची किती कामे बिघडवू शकतात. 

स्वत:ला मजबूत समजण्यासाठी जर तुम्हाला दुसऱ्याला दुःखी करावं लागत असेल तर तुम्ही मजबूत नाही खूप कमकुवत आहात. कित्येकदा असं घडत असेल की, तुम्ही या प्रयत्नात असाल की, सर्व काही ठिक व्हावं; परंतु शेवटी लक्षात आलं की आपली ऊर्जा वाया गेली फक्त, हातात काहीच आलं नाही. तुम्ही त्या गोष्टींनासुद्धा सावरण्याचा प्रयत्न करीत होतात, ज्यांचे नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात होतं.
थोडे नवीन जरा जुने