आरोग्याशी संबंधित छोट्या-छोट्या आजारांवर आहेत घरातच लाभदायक उपाय !आरोग्याशी संबंधित छोट्या-छोट्या समस्यांसाठी आता डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्ती घरच्या घरीच अनेक समस्या सोडवू शकतो, फक्त त्याला योग्य माहिती असली पाहिजे.
घरात असलेल्या अनेक वस्तू दुहेरी भूमिका बजावू शकतात. उदाहरणार्थ भाजणे, पायांमध्ये फंगल इंफेक्शन होणे, त्वचा व हिरड्याशी संबंधित विकार इत्यादी समस्यांवर घरच्या घरीच सहजपणे उपाय सापडतात. जाणून घेऊया आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी वापर करण्यात येणा-या अशाच काही घरगुती उपायांच्या बाबतीत...

कोरफड 

प्रमुख फायदा : भाजल्यावर कोरफडीचा जेल एक किंवा दोन डिग्रीवर जळालेल्या जागेवर लावतात. 

इतर फायदे : तोंडात फोड आल्यावर कोरफडीचा गर लावल्यास फायदा मिळतो. अमेरिकन सोसायटी फॉर डेंटल अ‍ॅस्थेटिक्सचे अध्यक्ष इरवीन स्मिजेल यांच्या मते, कोरफडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, तसेच अ‍ॅमीनो अ‍ॅसिडही असते. यामुळे तोंडातील फोडांमुळे दुखापतग्रस्त झालेल्या टिश्युजचे नूतनीकरण करण्यास मदत होते. तसेच तोंड आल्यानंतर तोंडातील फोडांमुळे येणारी सूज दूर करण्यातही कोरफड फायदेशीर आहे. या फोडांवर कोरफडीचा गर लावल्याने 50 टक्के आराम पडतो. 

दही
प्रमुख फायदा : पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते यामध्ये असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया पचनक्रिया चांगली ठेवतात. तसेच दह्यामुळे बाउल फंक्शन म्हणजेच पोट साफ होण्याची प्रक्रिया सुद्धा नियमित राहते. 

इतर फायदे : दह्यामध्ये आढळून येणा-या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे हिरड्यांचा हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव होतो. तसेच हिरड्यांशी संबंधित त्रास दूर होतो. जपान येथील क्युशू विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते, दररोज 55 ग्रॅम दह्याचा जेवणात समावेश केल्याने पिरिओडोंटल डिसीज (हिरड्यांशी संबंधित समस्या) ची शक्यता कमी होऊ शकते. तसेच जे लोक दह्याचे सेवन करत नाहीत त्यांना हे विकार होण्याचा धोका जास्त असतो.

बेकिंग सोडा 

प्रमुख फायदा : काळे पडलेले दात पांढरे होतात. अनेक डेंटिस्ट दातांच्या मुळात असलेले सुपरफिशियल स्टेंस हटवण्यासाठी बेकिंग सोडा वापरण्याचा सल्ला देतात. यामुळे दात चमकदार होतात. तसेच तोंडाचा वास येत नाही आणि प्लाकही होत नाही. 

इतर फायदे : सूर्यप्रकाशाच्या अधिक संपर्कात राहिल्याने इजा झालेली त्वचा आणि इतर विकार दूर करण्यात बेकिंग सोडा फायदेशीर आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील डर्मेटोलॉजीचे क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर लिंडा के. फ्रँक्स यांच्या मते, बेकिंग सोड्यातील सोडियम बायकार्बोनेट त्वचेचा टेक्शचर सुधारण्यात मदत करते. त्यामुळे आंघोळ करण्यापूर्वी बेकिंग सोडा पाण्यात मिसळला पाहिजे. 

माऊथ वॉश 

प्रमुख फायदा : श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदा होतो. माऊथ वॉशच्या अँटिमायक्रोबियल प्रॉपर्टीमुळे तोंडाच्या दुर्गंधीसाठी जबाबदार असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. एनवाययु कॉलेज ऑफ डेंटिस्ट्रीमध्ये पिरियोडोंटोलॉजी अँड इंप्लांट डेंटिस्ट्रीचे क्लिनिकल असोसिएट प्रोफेसर एडगर्ड ईआय चार यांच्या मते, माऊथ वॉशमुळे श्वासाची दुर्गंधी सुद्धा दूर होते. 

इतर फायदे : खेळाडूंच्या पायांमध्ये होणा-या फंगल इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी सुद्धा माऊथ वॉश घेणे फायदेशीर आहे. आंघोळ केल्यानंतर कापसाच्या बोळ्यात माऊथ वॉश घेऊन पायांच्या बोटांमध्ये लावावा. माऊथ वॉशच्या अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे इंफेक्शनसाठी कारणीभूत बॅक्टेरिया नष्ट होतात.
थोडे नवीन जरा जुने