योगासने करत असताना 'ह्या' नियमांचे पालन करायलाच हवे !


साधारण मनुष्य जीवनातील समस्त गुप्त शक्तींना जागृत न करता जीवन व्यर्थ घालवितो. या शक्तींना जागृत करण्यासाठी आपल्याला योगासने खूप साहय्यक ठरू शकतात. 

आसनांच्या अभ्यासाने शरीर निरोगी, मन प्रसन्न व बुद्धी तीक्ष्ण बनेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुखद स्वप्न साकार करण्याची गुरुकिल्ली आपल्या अंतर्मनात लपलेली आहे. आपले अदभूत सामर्थ्य प्रगट करण्यासाठी ऋषींनी समाधीतून प्राप्त झालेल्या या आसनांचे अवलोकन केले आहे.

शौच-स्नानादीनंतर आसने केली गेली तर उत्तम आहेत. श्वास तोंडाने ने घेता नाकानेच घेतला पाहिजे.


योगासने घोंगडी, पोते, गरम कांबळे असे काही अंथरून त्यावरच आसने करावीत. उघड्या जमिनीवर काही न अंथरता कधीही आसने करू नयेत. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेला विद्युत-प्रवाह नष्ट होणार नाही.


आसन करीत असताना शरीरासोबत जबरदस्ती करू नये. आसन म्हणजे कसरत नव्हे.


आसने केल्यानंतर थंडीत किंवा किंवा जोराच्या वाऱ्यात बाहेर निघू नये. स्नान करावयाचे असल्यास थोड्यावेळाने करावे.


आसन करतेवेळी शरीरावर कमीतकमी व सैल कपडे असावेत.


स्त्रियांनी गरोदरअवस्थेत कोणतेही आसन करू नये.


आसनानंतर थोडे ताजे पाणी पीणे लाभदायक आहे. ऑक्सिजन व हायड्रोजन मध्ये विभाजन होऊन संधी स्थानातील भागातून मल काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.
थोडे नवीन जरा जुने