कधीच आजारी पडायचे नसेल तर फक्त एवढच करा...


आरोग्य ही खरी संपत्ती आहे. त्यामुळे मानवी जीवनात आरोग्याला खूप महत्त्व दिले आहे. विज्ञानाच्या बळावर माणसाने प्रचंड प्रगती केली आहे. अनेक सुख साधने उपलब्ध झाली आहेत. परंतु आरोग्याच्या समस्या वाढल्यामुळे या भौतिक सुविधांचा भोग घेणे अशक्य झाले आहे. कारण पैशाच्या जोरावर महागडी औषधे खरेदी करता येतील परंतु चांगले आरोग्य कोठून खरेदी करणार.


आरोग्यावर भारतात हजारो वर्षांपासून संशोधन झाले आहे. भारतात जन्मलेली आयुर्वेद उपचारपद्धती काळाच्या कसोटीवर उतरली आहे. आज जगात आयुर्वेदाबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. कारण आयुर्वेदात आरोग्याची शाश्वत सूत्रे आहेत. निरोगी शरीरासाठी आयुर्वेदात तीन सूत्रे आहेत...

1. हितभुक् ... म्हणजे आपली प्रकृती आणि क्षमता पाहूनच हितकारी आणि स्वास्थ्यवर्धक भोजन ग्रहण करा.

2. मितभुक् ... सदैव भूकेपेक्षा थोडे कमी भोजन करा, भोजन कितीही स्वादिष्ट असले तरी.

3. ऋतभुक् ... आपले शरीर आणि ऋतू ध्यानात घेऊन कधी काय खायचे हे ठरवा.
थोडे नवीन जरा जुने