मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी "हे" काही खास उपाय ठरतील खूपच फायदेशीर !


मधुमेहावर उत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काम कराच. डॉक्टरही तुम्हाला मदत करतील; पण यात तुमचा स्वत:चा वाटाच फार महत्त्वाचा आहे. यामुळे मधुमेहाची सर्व माहिती असणे अत्यंत जरुरी आहे. त्यामुळे विविध लक्षणे आपण लवकर डॉक्टरांच्या निदर्शनास आणू शकता. 


1. नियमित व्यायाम करणे, 2) संतुलित आहार घेणे, 3) नियमित ठरावीक वेळी औषधे घेणे, 4) डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे रक्तचाचण्या (टेस्ट) तसेच इतर तपासण्या वेळेवर करणे. आपल्या काही शंका असतील तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे. 


मधुमेह आणि आहार - 


नियमित औषधे घेतल्यानंतरही नियंत्रित आहार, घेण्याची गरज आहे का? 

होय कारण जर आपले आहारावर नियंत्रण नसेल तर आपण घेतलेली औषधे अपुरी पडतात व त्याचा डोस वाढवत जावा लागतो. याउलट जर का आपण नियंत्रित आहार ठेवला तर औषधांचे प्रमाण तर कमी येईलच; पण इतर आजारही उद्भवणार नाहीत. 


नियंत्रित आहार म्हणजे काय - 


नियंत्रित आहार म्हणजे आपल्या आहारातील सर्व जेवणात उष्मांकाचे (कॅलरी) व्यवस्थित वाटप होणे. त्यासाठी आपणास थोडा थोडा, पण जास्त वेळा आहार घेणे जरुरी आहे, त्यामुळे तुमचे वजन आदर्श राहू शकते. 

मधुमेहींनी रोज रोज एकच प्रकारचा आहार घ्यावा का ? 

नाही, एकदा आपणास नियंत्रित आहार कसा घ्यावा हे लक्षात आल्यावर आपण अन्नाची अदलाबदल करून आपल्या कुटुंबातील इतर व्यक्ती घेतात तोच आहार घेऊ शकता. त्यामुळे आपणास एकाच प्रकारचे अन्न खावे लागणार नाही. 


आहारातील प्रमुख घटक असे आहेत


कार्बोहायड्रेट्स -


 हे आपल्याला शक्ती देणारे प्रमुख घटक आहेत. साधारणपणे 60 याचे आहारात प्रमाण असावे. उदा. : भात, भाकरी, गव्हाचे पीठ, चपाती, ज्वारी, नाचणी, मका, बाजरी. 


प्रोटीन - 


याचे प्रमाण साधारणपणे 15- 20 असावे. उदा : डाळी, कडधान्ये, तसेच दूध, मास, मासे, म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा चरबीचे प्रमाण जास्त असते. म्हणून त्याचे प्रमाण मर्यादित असावे. 

स्निग्ध पदार्थ (चरबीयुक्त) : तेल, तूप, शेंगदाणे, काजू, अक्रोड, बटर इ. शक्तिदायक असतात; पण याचे प्रमाण अत्यल्प असावे, तसेच तळलेल्या वस्तूंचे प्रमाण कमी असावे. 

फायबर्स 


कोणत्याही प्रकारच्या खनिज, व्हिटॅमिन व फायबर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आहारात विविधता येते व साखरेचे प्रमाणपण मर्यादित राहते. हे आहारात असणे आवश्यक आहे. 

फळे : फळांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिज व फायबर याचे प्रमाण जास्त असते. म्हणून मध्यम आकाराचे (100 ग्रॅम, 10-15) आपण घेऊ शकता. 

काही फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण असते म्हणून त्याचा वापर कमी करावा. (उदा : चिकू, पिकलेले केळ, इ.) 

मधुमेही उपवास करू शकतात का ?

उपवासामुळे शरीरातील रासायनिक क्रियेत बदल होतो. त्याचा मधुमेहावर दुष्परिणाम होतो म्हणून पूर्ण उपवास करण्याचे टाळावे. उपवास करणे अत्यंत आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करावा. 

मधुमेह आणि व्यायाम 


नियमित व्यायाम हा मधुमेहाच्या उपचार पद्धतीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. व्यायामामुळे रक्तातील साखरेचा वापर केला जातो तसेच वजन व्यवस्थित राहण्यास मदत होते. व्यायामामुळे रक्तप्रसारात सुधार होतो व प्रकृती सुधारते. मधुमेहावर जर नियंत्रण असेल व इतर काही विकार नसतील तर तुम्ही इतर माणसांप्रमाणे कोणताही व्यायाम करू शकता. तुमचे वय, वजन, मधुमेहाचा प्रकार याचा विचार करून डॉक्टर तुम्हाला व्यायाम सुचवतील. 


व्यायामाचा प्रकार -


जोरात चालणे - 3.6 कॅलरी खर्च (प्रति मिनिट), सायकलिंग - 4.5, धावणे - 5.0, पोहणे - 6.0 

फ्री फूड म्हणजे काय ? 

बर्याच वेळा जेवण घेतल्यावरही भूक लागते. अशा वेळी अत्यंत कमी कॅलरी असलेले अन्न घेण्यास हरकत नाही. त्यालाच फ्री फूड म्हणतात. उदा :- अ) सॅलड्स, कोबी, कांदा, टोमॅटो, मुळा, कारकडी इ. ब) दूध-साखर, शिवाय चहा, क) लिंबू-पाणी (साखरेशिवाय), ड) पातळ सूप. 


मधुमेहींनी व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी ? 


व्यायाम संथ गतीने सुरू करून हळूहळू त्यात वाढ करावी, व्यायामाचे प्रमाण एकदम कमी-जास्त करू नये, व्यायाम ठरावीक वेळेत नियमित करावा, व्यायाम करताना खडीसाखर यासारखे गोड पदार्थ जवळ ठेवावे म्हणजे साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यास त्याचा उपयोग होईल, तुमची रक्तशर्करा खूपच असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय व्यायाम करू नये. 


हायपोग्लासेनिया म्हणजे काय व त्याची कारणे आणि लक्षणे. 


हायपोग्लासेनिया म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम कमी होणे. त्याची कारणे अशी : योग्य वेळी व योग्य प्रमाणात औषधे न घेणे, औषधे घेतली पण आहार योग्य वेळी न होणे, अचानक व्यायामाचे प्रमाण वाढविल्यास, मद्यपानाचे प्रमाण जास्त वाढविल्यास. लक्षणे :- भुकेमुळे पोट दुखणे, अतिशय घाम येणे, अस्वस्थ वाटणे, छाती धडधडणे-थरथर कापणे, डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, चिडचिडेपणा-मनात गोंधळ निर्माण होणे, अतिशय झोप येणे, चक्कर येणे-बेशुद्ध होणे.
थोडे नवीन जरा जुने