महिलांसाठी - तुमच्या BODY ला परफेक्ट शेप देण्यासाठी काय कराल?परफेक्ट कर्व्ही फिगर असणे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. कर्व्ही फिगरचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वात सोपा आणि अचूक उपाय आहे योगासन. योगासनाच्या अभ्यासाने केवळ तुम्ही शरीराची वाढलेली चरबी कमी करत नाहीत तर यामुळे तुमचे शरीर जास्त लवचिक आणि सुदृढ बनते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक योगासनाची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमच्या शरीराला परफेक्ट शेप मिळेल.

भुजंगासन विधी - 

जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पोटावर पालथे झोपा. दोन्ही पाय आणि पंजे परस्पर जुळलेले असावेत. पायाचे अंगठे मागील बाजूस खेचावेत. दोन्ही हात डोक्याकडे लांब करावे. पायाचे अंगठे, बेंबी, छाती, कपाळ आणि हातांचे तळवे जमिनीवर एकाच रेषेत असावेत.

आता दोन्ही हात कंबरेजवळ घेऊन जा. डोके आणि कंबर वर उचलून शक्य होईल तेवढे मागील बाजूस वळवा. बेंबी जमिनीस टेकवा. संपूर्ण शरीराचे वजन हाताच्या पंजावर येईल. शरीराची स्थिती कमानीसारखी करावी. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकावर दबाव केंद्रित राहील. 

चित्तवृत्ती कंठात आइन दृष्टी आकाशाकडे स्थिर करा. २० सेकंद हीच स्थिती ठेवा. नंतर डोके हळूहळू खाली घेऊन या. छाती जमिनीला टेकवा. नंतर डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. आसन सोडताना मूळ स्थितीत आल्यावर श्वास खूप हळूहळू सोडावा. दररोज एकाचे वेळी ८-१० वेळेस हे आसन करावे.

लाभ - 

या आसनाने जठराग्नी प्रदीप्त होतो, सर्व रोगांचा नाश होतो आणि कुंडलिनी जागृत होते. या आसनामुळे नाडीतंत्र सचेत बनते. शरीर चिरंजीवी, बलशाली आणि सुदृढ बनते. या आसनाने पाठीचा कणा लवचिक बनतो. अपचनाची समस्या दूर होते. छाती व पोटाचा विकास होतो. जेवणानंतर होणारा गॅसचा त्रास दूर होतो.
थोडे नवीन जरा जुने