Marathi Recipes : घराच्या घरी बनवा चवदार राजमा पनीर सँडविचराजम्यापासून बनवलेले हे वेगळया प्रकारचे सँडविच मुख्यत्वे प्रथिनांनी युक्त आहे. राजमा व पनीर हे एक हटके मिश्रण आहे. डब्यात वरण-भात नेणे शक्य नसते. त्यामुळे त्याला हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. वरण – भातामधून मिळणारी सर्व पोषकतत्त्वे यातून मिळतात.

साहित्य :
शिजलेला राजमा – एक वाटी, भात एक वाटी, पनीर – ७५ ग्रॅ, बारीक चिरलेला कांदा - एक , आलं - मिरची पेस्ट चवीप्रमाणे, जिरेपूड व मिरपूड प्रत्येकी अर्धा चमचा, टोमॅटो सॉस - पाव वाटी, मिठ – चवीपुरते, तेल - पाव वाटी, रवा किंवा ब्रेड क्रम्ब्स.

कृती :
- सर्वप्रथम शिजलेला राजमा, भात, कांदा, आलं - मिरची पेस्ट व मीठ हे एकत्र करून त्या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार करा.
- पनीरच्या पातळ गोल आकाराच्या चकत्या कापून घ्या.
- आता वरील मिश्रणाच्या गोळयाला वाटीचा आकार द्या.
- त्यानंतर पनीरच्या चकत्यांना टोमॅटो सॉस लावून या चकत्यांना वरील वाटीत घाला.
- वाटीचे तोंड व्यवस्थित बंद करून छान गोल आकार द्या.
- ब्रेड क्रम्समध्ये घोळून हे सँडविच शॅलो फ्राय करा.
थोडे नवीन जरा जुने