RELATIONSHIP - परमोच्च सुखाचा आनंद घेताना पुरुषांना पडणारे 'हे' प्रश्न तुम्हाला माहिती आहे का ?


आपल्याकडे सेक्सबद्दल फार उघडपणाने बोलले जात नाही. ते बोलणं अजूनही काही लोकांना पाप वाटतं किंवा मग संस्काराच्या बाहेरचं. सेक्स करताना आपले मन कधीच शांत नसते. कितीतरी प्रश्न आपल्याला नेमके त्याचवेळी पडतात. सेक्स करुन झाल्यानंतर आपल्याला असा विनोदी प्रश्न कसा पडू शकतो? असा आणखी एक प्रश्न पडतो आणि आपल्याला हसूच येते. आता तुम्हाला उत्सुकता असेल की हे प्रश्न नेमके कोणते?

मी बरोबर करतो / करतेय ना?

सगळा मूड सेट असताना आणि सेक्स सुरु झाल्यानंतर मनात पहिला येणारा प्रश्न म्हणजे हे बरोबर आहे का? म्हणजे जे काय सुरु आहे ते बरोबर आहे ना? व्हिडिओमध्ये असचं काही दाखवलं होतं. पण प्रॅक्टिकली हे बरोबर आहे का? असा विचार अनेकांच्या मनात डोकावतो.

यावेळी गेल्यावेळेपेक्षा जास्त व्हायला हवं

चूक किंवा बरोबर हे ठरतं नाही तर लगेच दुसरा प्रश्न मनात येतो तो यावेळी थोडा जास्तवेळ सेक्स करायला हवं त्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करायला हवं.. सेक्सपेक्षा सेक्स आधीचा फोर प्ले महत्वाचा असतो. तो फोर प्ले तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एन्जॉय करा. सेक्स कितीवेळ करायला हवे यासाठी काही प्रमाण वेळ ठरविण्यात आलेली नाही. तुमचा पार्टनर तुमच्या सेक्स मुव्हजमध्ये आनंदी असेल तर सेक्सचा मनमुराद आनंद लुटा हा प्रश्न सोडून द्या.

मी थोडं आणखी चांगले करण्यासाठी काय करु?

सेक्स सुरु असतानाच त्यात प्रणयाची आणखी फोडणी घालण्यासाठी बरीच जण काय- काय करतात. म्हणजे कान चावणे, मानेला चावणे, ओठांना चावणे असे बरेच काही केले जाते.

हे सगळं जीममधल्या व्यायामसारखे आहे नाही का?

जीममधला अर्धा व्यायाम सेक्सवेळी केला जातो आता हा प्रश्न अगदीच हसू आणणारा आहे. विनोदाचा भाग सोडला तर पण हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातल्या जात जर तुम्ही नेहमी जीमला जाणारे असाल तर तुम्हाला सेक्स पोझीशन आणि व्यायाम आठवायला लागतात.

मला गुदगुल्या का होतायत?

सेक्सवेळी शरीर एकमेकांच्या इतके जवळ असते की, गुदगुल्या होणे स्वाभिक असते. विशेषत: पोटाकडील भागाकडे गुदगुल्या होऊ लागतात.
आवाज जरा जास्तच नाही ना?

माझ्या पायाचे केस तर दिसत नाही ना?

मुलांपेक्षा सगळ्यात जास्त प्रश्न कोणाला पडत असतील ते मुलींना… कारण प्रत्येकवेळी त्यांना चांगले दिसायचे असते. सेक्स करतानासुद्धा. हातापायावर असलेले केस नकोसे होतात.त्यात जर वॅक्स करुन महिना झाला असेल तर ते केस पार्टनरला दिसत नाही हा प्रश्न पडतो.

माझे पोट तर दिसत नाही ना?

अनेक जण वेगवेगळ्या सेक्स पोझीशन ट्राय करुन पाहत असतात. या सगळ्या पोझीशनमध्ये आपल्याला परफेक्ट दिसायचे असते. म्हणजे बेडवर सेक्सीच दिसायला प्रत्येकाला हवे असते. त्यातच जर थोडं पोट असेल तर मग सारखं लक्ष पोटाकडे जाते.

माझ्या परफ्युमचा सुगंध चांगला आहे ना?

सेक्स करताना दोघांनाही समोरच्याला जास्त चांगलं वाटावं असं वाटत असतं.त्यासाठी बरचं काही काही केले जाते. परफ्युम ही अशी गोष्ट असते की, ती सेक्स करताना तुमचा मूड चांगला करते. पण जर तुमचा परफ्युम चांगला नाही असे तुम्हाला सारखं वाटत राहिले तर मग प्रेम करण्याचा तुमचा दिवस नाहक वाया जाईल.

आज कसं झालं विचारायचे का?

इतकी मेहनत करुन सगळे करुन झाल्यानंतर जेव्हा दोघांच्या एकांताची वेळ येते. तेव्हा पुन्हा एकदा आपले मन प्रश्नांनी भरुन जाते. आता सेक्स झाल्यानंतर चांगले झाले का? आज कसं वाटलं अस एकमेकांना प्रश्न विचारायची इच्छा असते. पण ते विचारायचं कसं ते कळत नाही. मग काय पुन्हा पुढची वेळ येईपर्यंत आणखी नवे प्रश्न निर्माण होतात.

त्याला मी आवडते ना?

मुलींची विचार करण्याची पद्धत फारच वेगळी असते. सगळं झाल्यानंतर त्यांना आनंद तर झालेला असतो. पण त्यांना त्या नंतरही ते क्षण आठवून खूप प्रश्न पडतात. त्याला मी नक्की आवडते ना? त्याचे माझ्यावरील प्रेम कमी तर झाले नाही ना? असे काहीतरी वेड्यासारखे प्रश्न पडायला लागतात. 
थोडे नवीन जरा जुने