सिंगल रहा कारण हे होतील मोठे 5 फायदे


आज तसं पहायला गेलं तर अशा लोकांची संख्या वाढली आहे जे सिंगल राहने पसंत करतात. जो व्यक्ती सिंगल आहे तो व्यक्ती स्वत:वर, स्वत:ला खूश ठेवण्यावर पूर्णपणे लक्ष देऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या रिसर्च मधूनही हे समोर आले आहे की, सिंगल राहण्याचेही अनेक फायदे आहेत.

१) सिंगल लोकांची घट्ट मैत्री :
रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे की, ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे किंवा जे लोक रिलेशनशीपमध्ये आहेत, अशांच्या तुलनेत जे लोक सिंगल असतात त्यांचं आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी आणि शेजा-यांशी नातं अधिक चांगलं असतं.

२) ते असतात जास्त फिट :
एका स्टडीमधून खुलासा झाला आहे की, ब्रिटेनचे ७३ टक्के लोक एका आठवड्यात १५० मिनिटे एक्सरसाईजही करू शकत नाही. हे सगळे लोक विवाहीत आहेत. तेच सिंगल किंवा घटस्फोटीत लोक अधिक फिट राहतात. २०१३ मध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार हे समोर येतं की, नव्याने लग्न झालेल्या जोडप्याचे ४ वर्षातच वजन वाढतं

३) कामात आनंद :
जेव्हा तुम्ही सिंगल असता त्यावेळी तुम्ही तुमचं करिअर अधिक चांगलं करण्यासाठी वेळ देऊ शकता. रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, लग्न झालेल्या किंवा रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांच्या तुलनेत सिंगल लोक आपल्या कामाला जास्त एन्जॉय करतात.

४) पैशांची बचत :
आपल्या नातेवाईकांच्या घरी जायचे असो वा माहेरच्या लोकांसाठी गिफ्ट घ्यायचं असो किंवा आपल्या पार्टनरसोबत डेटवर जायचं असो. अशावेळी सिंगल लोकांपेक्षा लग्न झालेल्या लोकांचा खर्च अधिक होतो. यासोबतच सिंगल लोकांची कर्ज घेण्याची शक्यताही कमी असते.

५) चांगली लागते झोप :
सिंगल असण्याची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कुणाही सोबत शेअर करावा लागत नाही. तुमचं जेव्हा मन असेल तेव्हा तुम्ही झोपू शकता, कधीही उठू शकता, कुणीही विचारणारं नसतं. आणि अस असल्याने तुमची झोपही पूर्ण होईल आणि त्यामुळे कामही चांगलं होईल.
थोडे नवीन जरा जुने