टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळल्याने भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी


यवतमाळ : जोडमाहो येथे टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला  असून   6 जणांचा मृत्यू झाला तसेच  15 जण गंभीर जखमी झाले आहेत . जोडमाहोजवळील कळंब पोलीस ठाण्याअंतर्गत वाढोणा खुर्द येथे हा अपघात  घडला.
जोडमोहा येथील मृत बाबाराव वानखडे यांची राख शिरवण्यासाठी सर्वजण टाटा मॅजिक गाडीने कोटेश्वरला गेले होते. तेथून परतत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी झाडाला आदळली. गाडी झाडाला आदळताच ती खोल नाल्यात पलटली.

या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
थोडे नवीन जरा जुने