राज्यातील ६६ जण कोरोना निगेटिव्ह पाच जण रुग्णालयात निरीक्षणाखाली




मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजवर भरती झालेल्या ७० प्रवाशांपैकी ६५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून २ जण मुंबईत तर ३ जण पुण्यात भरती आहेत. 

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २२८ प्रवाशांपैकी १४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९ हजार ७८४ प्रवासी तपासण्यात आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७० जणांना भरती करण्यात आले होते. 

आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ६६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोराना करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. ६५ जणांना घरी सोडण्यात आले आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

थोडे नवीन जरा जुने