पुण्याला गेलात तर या 7 ठिकाणी भेट द्याच ! Best Places To Visit in Pune


पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण ''पुणे तिथे काय उणे '' प्रचलित आहे . महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे.चला तर आज जाणून घेऊया पुण्यातल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांविषयी






1) शनिवारवाडा :- पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. 



2)सिंहगड :- पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून ३५-४० कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले ” गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.



3)आगाखान पॅलेस :- गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले.



4) शिवनेरी किल्ला :- शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.



5) सारसबाग :- ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे. बागेमध्ये तळयाने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा ” तळयातला गणपती ” म्हणून प्रसिध्द आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पुर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिध्द होती. या ठिकाणी बोटींग करण्याची सोय आहे. या ठिकाणी “फुलराणी” नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूप आकर्षित करते.



6) लाल महाल :- लाल महाल हि वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे.लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.सध्याची लाल महाल हि वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे.



7)कसबा गणपती :- कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळयासमोर तंबू बांधला. आता ते पुण्यातील प्रसिध्द मंदिर आहे.

थोडे नवीन जरा जुने